शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दर मिळत नसल्याने गिलके, टरबूज फेकले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:56 IST

ब्राह्मणगाव : बाजार समित्या बंद असल्याने भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील युवा शेतकरी सुनील मधुकर अहिरे यांनी त्यांचे एक एकर शेतातील गिलके, टरबूज तोडून फेकून दिले. आधीच अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकवताना शेतकऱ्यांना निसर्गाशी दोन हात करावे लागत आहेत.

ठळक मुद्देबाजार समित्या बंद : ब्राह्मणगावी शेतकऱ्यांचा संताप

ब्राह्मणगाव : बाजार समित्या बंद असल्याने भाजीपाल्याला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून येथील युवा शेतकरी सुनील मधुकर अहिरे यांनी त्यांचे एक एकर शेतातील गिलके, टरबूज तोडून फेकून दिले. आधीच अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकवताना शेतकऱ्यांना निसर्गाशी दोन हात करावे लागत आहेत.

महागडी बियाणे, महागडी औषधे, मजुरी नैसर्गिक वातावरणाचा फटका हे सर्व नुकसान सहन करत असताना त्यातच लॉकडाऊन लागल्यामुळे भाजीपाला विक्री मंदावली आहे. सात ते आठ रुपये किलोने बळजबरीने माल विक्री करावा लागत आहे . काही शेतकरी डोक्यावर पाटीत भाजीपाला घेऊन गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विक्री करत आहेत. त्यातच पिकवकेल्या मालाला मोठी बाजार पेठ जवळ मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात गिलके उकिरड्यावर फेकून दिले जात आहेत.आर्थिक फटकासध्या हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी, गवार या सर्व भाजीपाल्याची सारखीच अवस्था झाली आहे. टरबूज , खरबूज, कलिंगडाबाबत शेतकऱ्यांना मोठी आर्थिक अपेक्षा होती. मात्र चालू असलेल्या कोरोना महामारीमुळे शेती व शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी टरबूज विक्री न करताच शेतातच पडू दिले आहेत. कांद्याचे घसरते भाव त्यात कांदा मार्केट बंद असल्याने मोठ्या आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. 

टॅग्स :agricultureशेतीMarketबाजार