नाशिक : आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था जायंटस इंटरनॅशनल फेडरेशनच्या नाशिक ते गोंदिया विभागाची पहिली बैठक हॉटेल रावल सिबलमध्ये शनिवारी चेअरमन विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली़ यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या कौन्सिल मेंबर्सला मार्गदर्शन करण्यात आले़ या बैठकीस नाशिक, धुळे, दोंडाईचा, शहादा, शिरपूर, सिंदखेडा, खामगाव, शेगाव, अमरावती, वरुड, नागपूर, गोंदिया अशा अनेक ठिकाणाहून कौन्सिल मेंबर्स आलेले होते़ बैठकीत संघटनप्रमुख म्हणून कॉम्प्टन ग्रीव्हजचे सेवानिवृत्त कर्मचारी डी़ एल़ जाधव यांची निवड करण्यात आली़ त्यांचा शपथविधी तसेच २०१४ चे पुरस्कार वितरण रविवारी समर्थ मंगल कार्यालयात केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबूराव बगाडे, अनुप जोशी, गौरव जाधव, अशोक पाटील, दिनकर पांडे, गोविंदभाई पटेल, मधुकर बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)
जायंटस इंटरनॅशनल कौन्सिलची बैठक संपन्न
By admin | Updated: January 18, 2015 01:24 IST