लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते.मुंबई - आग्रा महामार्गावर टोल वसूल करूनही ज्या पद्धतीने घोटी ते कसाºयाच्या दरम्यान खड्डे पडले आहेत, ते बघता दुरुस्ती-देखभाल न केल्याने टोल वसुली बंदच करायला हवी; मात्र तसे होत नसल्याने किमान रस्ते दुरुस्त करण्याची गरज असताना त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. हा सरळ सरळ नियमभंग असतानादेखील महामार्ग प्राधिकरण मूग गिळून बसले आहे.महामार्गाचे चौपदरीकरण किंवा सहापदरीकरण खासगीकरणातून करून त्या बदल्यात संंबंधित ठेकेदार कंपनीकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे शासनाला रस्त्यासाठी किंवा टोल कालवधीपर्यंत देखभाल-दुरुस्तीचा खर्च करावा लागत नाही, असा नियम आहे.परंतु त्याला कंपनीने हात लावलेला नाही आणि टोल वसुली मात्र सुरू आहे. त्यामुळे एक तर रस्ते सुधारावेत किंवा टोल बंद करावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे. परंतु प्रत्यक्षात हे धोरण कागदावरच आहे, ज्या कंपन्या रस्ते तयार करून टोल वसूल करतात, त्याच कंपन्या नंतर रस्त्याच्या अवस्थेकडे दुर्लक्षकरतात. मुंबई - आग्रामहामार्गाचे चौपदरीकरण झाले खरे, मात्र अनेक ठिकाणी रस्त्याचीदुरवस्था झाल्यानंतर टोल वसूल करणारी कंपनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते.कंपनी मात्र लक्ष पुरवण्यास तयार नाहीदरवर्षीप्रमाणे यंदाही घोटी, इगतपुरी आणि पुढे कसाºयापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. मुंबई-आग्रा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या रेल्वे पुरेशा संख्येने सुरू नसल्याने खासगी वाहनातूनच प्रवास मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळेच या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे; परंतु कंपनी मात्र कोणत्याही प्रकारे लक्ष पुरवण्यास तयार नाही. ‘लोकमत’ने केलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये रस्त्याची दुरवस्था दिसून आली.यापूर्वीही इगतपुरी-कसारादरम्यानचा रस्ता खचला आहे; परंतु त्याचे कामदेखील अद्याप पूर्ण नसून मलमपट्टी करून वाहतूक सुरू आहे. हा रस्ता खचला तेव्हा काही दिवस टोल बंद ठेवण्यात आला होता. आता टोल वसुली सुरू आहे. रस्त्याची कायमस्वरूपाची दुरुस्ती कधी होणार याबाबत कंपनी आणि महामार्ग प्राधिकरण मौन बाळगून आहे. आता खड्डे पडल्यानंतर तत्काळ दुरुस्ती अपेक्षित आहे.
घोटी - कसाऱ्यादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:36 IST
नाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते.
घोटी - कसाऱ्यादरम्यान महामार्गावर खड्डेच खड्डे
ठळक मुद्देरस्त्यांची दुरवस्था : टोल वसुली मात्र कायम