शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

घोटीकरांचा एल्गार : बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:21 IST

शहरातील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकासह अकरा वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी मोर्चा काढला.  ग्रामस्थांनी हातात फलक घेऊन दोषींवर कारवाई व्हावी अशा घोषणा दिल्या. घोटी पोलीस  ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, गटविकास अधिकारी किरण जाधव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकासह अकरा वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, गटविकास अधिकारी किरण जाधव यांना मागणीचे निवेदनआजपर्यंत अनेक रुग्ण चुकीच्या उपचारपद्धतीमुळे दगावल्याच्या घटना

घोटी : शहरातील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकासह अकरा वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी मोर्चा काढला.  ग्रामस्थांनी हातात फलक घेऊन दोषींवर कारवाई व्हावी अशा घोषणा दिल्या. घोटी पोलीस  ठाण्याचे सहायक पोलीसनिरीक्षक पंकज भालेराव, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, गटविकास अधिकारी किरण जाधव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.  शहरातील महाराणा प्रताप चौकातील अश्विनी ज्ञानेश्वर भोर यांच्या प्रसूतीदरम्यान नवजात अर्भकाचा चुकीच्या उपचारपद्धतीने घेतलेला बळी व फांगुळगाव येथील शालेय विद्यार्थिनी कविता भाऊसाहेब दुभाषे हिच्या मृत्यू प्रकरणी संबंधित बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. यावेळी पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले.आजपर्यंत अनेक रुग्ण चुकीच्या उपचारपद्धतीमुळे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देऊन संबंधित डॉक्टारांवर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, मनसेचे जिल्हा उपप्रमुख संदीप किर्वे, उपसभापती भगवान आडोळे, शिवसेनचे कुलदीप चौधरी, पंचायत समिती सदस्य  अण्णासाहेब पवार, युवक कॉँग्रेसचे भास्कर गुंजाळ, घोमकोचे माजी चेअरमन रामदास शेलार, अ‍ॅड. हनुमान मराडे, सिटूचे जिल्हा नेते देवीदास आडोळे, ज्ञानेश्वर भटाटे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष; बोगस डॉक्टरांची यादी इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वरातील ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. रु ग्णालयाच्या पाटीवर भलत्याच डॉक्टचे नाव तर उपचार करणारे डॉक्टर भलतेच असे सर्रास चित्र पाहण्यास मिळत आहे. संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाकडे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून बोगस डॉक्टरांची यादी पाठविण्यात आली असतानादेखील कुठलीही कारवाई झालेली नाही. शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यास कारणीभूत ठरत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर