पंचवटी : परिसरातील अनेक ठिकाणी घंटागाडी नियमित येत नसल्याने रस्त्यावर, तसेच नागरी वसाहतीत कचरा साचून राहतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा पूर्णपणे उचलला जात नसल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. उशिराने येणाऱ्या घंटागाडीबाबत प्रशासनाकडून कारवाई होत नाही. लोकप्रतिनीधींनीदेखील मौन पाळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.पंचवटी विभागात १२ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दैनंदिन कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आहे; मात्र कधी घंटागाडी येत नाही आणि आली तरी पूर्ण कचरा उचलला जात नाही. घंटागाडीबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे तक्र ारी केल्या असल्या तरी दखल घेतली जात नाही आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जात नाही. अनियमित येणाऱ्या घंटागाडीबाबत पंचवटीतील सर्वच लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. (वार्ताहर)
पंचवटी परिसरात उशिराने घंटागाडी
By admin | Updated: July 31, 2016 00:42 IST