शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:41 IST

नाशिकमध्ये सत्ता नसतानाही शिवसेनेचे नगरसेवक नाशिकचा चेहरा बदलण्याचे काम करीत असून, असेच कार्य पुढे सुरू ठेवत विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले.

सिडको : नाशिकमध्ये सत्ता नसतानाही शिवसेनेचे नगरसेवक नाशिकचा चेहरा बदलण्याचे काम करीत असून, असेच कार्य पुढे सुरू ठेवत विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले.  सिडको प्रभाग क्रमांक २५ मध्ये आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार राऊत बोलत होते. व्यासपीठावर संपर्कप्रमुख अजय चौधरी, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाला तांबडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडी प्रमुख सत्यभामा गाडेकर, नरेंद्र दराडे, सिडको प्रभाग सभापती सुदाम डेमसे, माजी सिडको प्रभाग सभापती कल्पना पांडे आदी उपस्थित होते.  यावेळी खासदार राऊत म्हणाले की, कुटुंबात मतभेत असू शकतात, परंतु मनभेद नसतात, याच पद्धतीने नाशिकमध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या तक्रारी न करता यापुढील काळातही सर्वांनी एकदिलाने कार्य सुरू ठेवत विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे, असे आवाहन केले. यापूर्र्वी काय झाले, काय घडले याचा विचार सोडून आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असेही ते म्हणाले. शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेले कार्य नाशिक शहरात नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांच्याकडून सुरू असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव होणे हे स्वाभाविकच आहे. महापालिका प्रशासनाकडून काम करून घेणे हे अवघड असून, हे काम करण्यात बडगुजरांचा हात कोणी धरू शकत नसल्याचे राऊत म्हणाले. प्रास्ताविकात नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.  प्रास्ताविकात नगरसेवक सुधाकर बडगुजर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार व संपर्क नेत्याच्या सूचनेनुसार मी संघटेनेचे काम करीत असून, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत सर्व जबाबदाºया पार पाडत असून, वेळप्रसंगी यासाठी आंदोलनेदेखील केली. शिवसेनाच्या माध्यमातून नागरिकांना अभिप्रेत असलेली विकासकामे प्रभागात राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.  यावेळी नगरसेवक श्यामकुमार साबळे, दिलीप दातीर, दीपक दातीर, हर्षदा गायकर, सुभाष गायधनी, नाना पाटील, गोपी गिलबिले, गणेश जाधव, पवन मटाले, पंकज जाधव, अंकुश शेवाळे, पंकज तिडके, पिंटू भामरे, नितीन परदेशी, सुरेश होळकर, रमेश जावरे, त्र्यंबक गांगुर्डे, हरिभाऊ आढाव, नाना निकम, गोपीनाथ सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वाती पेटकर यांनी तर आभार नगरसेवक हर्षा बडगुजर यांनी मानले. दरम्यान, शहरांमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून चर्चा केली. सामनगाव, जेलरोड, पाथर्डीफाटा आदि ठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलताना निवडणूकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.चांगल्या कामाचा गौरव थांबवू शकत नाही : चौधरीशिवसेना संपर्कप्रमुख अजय चौधरी यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुख कायम सांगत होते की शिवसैनिक हा रडणारा नाही तर लढणारा असतो. शिवसेना एक कुटुंब असून, सर्वांनी चांगले काम करत रहावे, आपण केलेल्या चांगल्या कामाचा गौरव हा कोणीही थांबवू शकत नाही. असेही शेवटी चौधरी यांनी सांगितले.