शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटार टप्पा दोनचे प्रलंबित अनुदान मिळणार

By admin | Updated: June 22, 2017 00:30 IST

नाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत महापालिकेने साकारलेल्या भुयारी गटार योजना टप्पा दोनचे प्रलंबित अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत महापालिकेने साकारलेल्या भुयारी गटार योजना टप्पा दोनचे प्रलंबित अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली असून, केंद्र सरकारच्या हिश्श्यापोटी देय निधीपैकी ८० टक्के रक्कम महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. महापालिकेने टप्पा दोन अंतर्गत आगर टाकळी व पंचक येथील मलनिस्सारण केंद्राचे काम ३१ डिसेंबर २०१६ पूर्वीच पूर्ण केलेले आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या पायाभूत सुविधांविषयक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. सदर अभियान मार्च २०१४ मध्येच संपुष्टात आले. मूळ अभियानातील ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रगती असणाऱ्या प्रकल्पांना पुढील निधी वितरित झाला नाही. नाशिक महापालिकेने भुयारी गटार योजना टप्पा एक आणि दोन जेएनएनयूआरएम अंतर्गत पूर्णत्वाला नेल्या. मात्र, टप्पा दोनअंतर्गत तिसरा आणि चौथा हप्ता मिळू शकला नव्हता. सदर हप्ता मिळावा यासाठी महापालिकेने वारंवार पाठपुरावा केला होता.  टप्पा दोनमधील पंचक आणि आगर टाकळी मलनिस्सारण केंद्राचे काम बाकी होते. मात्र, राज्य सरकारने सदर काम ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी महापालिकांनी स्वनिधीतून पूर्ण करावे, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, महापालिकेने पंचक येथील ३२ एमएलडी तर आगरटाकळी येथील ४० एमएलडी मलनिस्सारण केंद्राचे काम पूर्ण केले. दरम्यान, मंगळवारी (दि.२०) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊन केंद्राचे संपूर्ण अनुदान न मिळालेल्या १८ प्रकल्पांना राज्य शासनाकडून अनुदान देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार, केंद्राच्या हिश्श्यापोटी देय निधीपैकी ८० टक्के रक्कम राज्य शासनाकडून मिळणार असून उर्वरित २० टक्के भार महापालिकेला उचलावा लागणार आहे. मात्र, प्रकल्पनिहाय निर्णय घेण्याचे अधिकार नगरविकास विभागाला देण्यात आले आहेत.