शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी घरबसल्या मिळवा पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:17 IST

मोबाइलवरूनच मिळविता येणार पास कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पासची सुविधा उपलब्ध करून ...

मोबाइलवरूनच मिळविता येणार पास

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, आपल्या मोबाइलवरूनच पास मिळविता येणार आहे. पास मोबाइलमध्येच डाऊनलोड करून ठेवल्याने कोणत्याही प्रवासामध्ये तसेच मॉलमधील प्रवेशासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. लोकल प्रवासाच्या पाससाठी पास लागणार असून, आपल्याकडे लोकल नसल्या तरी इतर हवाई, रेल्वे प्रवासासाठी त्याचा उपयोग होऊ शकणार आहे.

जिल्ह्यात दोन्ही डोस घेतले किती?

फ्रंटलाइन वर्कर्स - ७७,१२१

१८ ते ४४ वयोगट - ४५,२३१

४५ ते ६० वयोगट - २,१६,९४०

६१ पेक्षा जास्त वयाचे - १,५०,५०८

दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण - ४,८९,८००

असा मिळवा ई-पास

- पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.

- त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.

- त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाइल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाइलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.

- हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.

- त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.

- त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.

- या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाइल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाइल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.

- ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.

- लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.

कोट-

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी ऑटो जनरेट पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पासला सिस्टीममधूनच मंजुरी मिळते. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही. दोन्ही लस घेतलेले नागरिक आपापल्या मोबाइलवर हा पास डाऊनलोड करून घेऊ शकतात.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक