शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातून विसर्ग करा!

By admin | Updated: August 20, 2016 00:19 IST

येवला : धरणातील उर्वरित पूरपाणी नदीमार्गे सोडण्याची मागणी

 येवला : नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्याला पूरपाणी नदीमार्गाने जात असल्याने ‘नाशिक जिल्हा उपाशी, तर मराठवाडा तुपाशी’ अशी संतप्त भावना जिल्ह्यातून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकरी व्यक्त करत असतानाच्या पार्श्वभूमीवर येवल्याचे अ‍ॅड. शाहूराजे माणिकराव शिंदे हे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आगामी आठ दिवसात हस्तक्षेप जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठ व मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. १९०५ साली करंजवण व नंतर पालखेड धरण बांधताना नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाने होरपळत असलेल्या येवला तालुक्यासाठी पाणीवापर गृहीत धरण्यात आला होता. पर्जन्यछायेचा व दुष्काळी प्रदेश गृहीत धरून जिल्ह्यातील धरणे बांधली आहेत. या बाबीचा विचार मराठवाड्याच्या पाण्यासाठी भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत दुर्लक्षित झाला असल्याची भावना येवला तालुकावासीयांची आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून मराठवाडा व नाशिक पाणीप्रश्नावरून वाद पेटत आहे. मराठवाड्याला पाणी देण्यासाठी विरोध नाही; मात्र नाशिककरांसह येवल्याची तहान अगोदर भागवा, मगच पूरपाण्याचा विसर्ग नदीमार्गे करा, अशी मागणी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांकडून होत आहे. पाणी देण्यावरून सातत्याने संघर्ष होतो. दोन वर्षांपासून समन्यायी पाणीवाटपाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याला सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सिंचन धोक्यात आले आहे. आता न्यायालयाच्या आदेशाने मराठवाड्याला पूरपाणी दिले जात आहे; परंतु येवला तालुका मात्र उपेक्षितच राहत आहे. गेल्या वीस वर्षात प्रथमच आॅगस्ट महिन्यात करंजवण धरण भरले. त्यामुळे येवलेकरांच्या आशा वाढल्या. परंतु पूरपाण्याचा थेंबही अद्यापपावेतो येवल्याला मिळालेला नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असला तरी येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पीकपाणी आले मात्र विहिरी, बंधारे, पाझर तलाव अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पाण्याची उपलब्धता असली तरी आगामी दिवसांत येवला तालुक्याला पुन्हा दुष्काळाच्या सावटाखाली जाण्याची चिन्हे असतानादेखील पूरपाण्याचा थेंबदेखील येवल्याला मिळू नये ही शोकांतिका आहे. (वार्ताहर)