शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वर ओंकाराने सजली पाडवा पहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:46 IST

अहिर भैरव रागापासून प्रारंभ झाल्यानंतर देसकार अन् हिंदोल रागांचे बहारदार सादरीकरण करीत प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांनी पाडवा पहाट मैफलीत रंग भरले. उत्तरार्धात भजन, अभंग आणि नाट्यगीतांनी पिंपळपारावरील मैफल खुलत गेल्याने गोडगुलाबी थंडीत रसिकांना वेगळ्याच आनंदाची अनुभूती दिली.

नाशिक : अहिर भैरव रागापासून प्रारंभ झाल्यानंतर देसकार अन् हिंदोल रागांचे बहारदार सादरीकरण करीत प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांनी पाडवा पहाट मैफलीत रंग भरले. उत्तरार्धात भजन, अभंग आणि नाट्यगीतांनी पिंपळपारावरील मैफल खुलत गेल्याने गोडगुलाबी थंडीत रसिकांना वेगळ्याच आनंदाची अनुभूती दिली.नेहरू चौकातील पिंपळपारावर संस्कृती नाशिक पाडवा पहाटची मैफल प्रख्यात गायक ओंकार दादरकर यांच्या शास्त्रीय स्वरांनी न्हाऊन निघाली. ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आमदार हेमंत टकले, अ‍ॅड. विलास लोणारी, डॉ. अनिरु द्ध धर्माधिकारी, सुरेश भटेवरा, गुरु मित बग्गा, अ‍ॅड. जयंत जायभावे, उद्योगपती श्रीरंग सारडा, श्रीपाद कुलकर्णी, विनोद शहा, कर्नल इंगोले, माजी महापौर अशोक मुर्तडक, शिवाजी गांगुर्डे, डॉ. नारायण विंचूरकर, बाळासाहेब गामणे, रवींद्र कदम, अ‍ॅड. अशोक जाधव, गुलाम शेख व धनपाल जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने मैफलीचा शुभारंभ झाला.ओंकार यांनी अहिर भैरव रागाने मैफलीचा प्रारंभ केला. विलंबित ख्याल एकताल बंदिशींचे बोल होते गोकुल के अहिर... त्यानंतर द्रुत तीनतालाचे बोल दरस भये व द्रुत एकतालात बेग बेग आवो मंदिर ही बंदिश सादर केली. त्यानंतर देसकार रागातील मध्यलयीतील तीनतालात झानजरिया झनके हा तराणा पेश केला. मीराबार्इंचे जोगिया रागातील मेरो मन राम राम रटे हे अवीट भजन सादर केले. उत्तरार्धात राग हिंदोलमधील कोयलिया बोले ही मध्य लयीतील बंदिश, काळ देहासी आला खाऊ हा नामदेव महाराजांचा अभंग, नारायणा रमा रमणा व राम रंगी रंगले ही नाट्यगीते व अखेरीस शिव के मन शरण हो हा भैरवीमधील अभंग गाऊन मैफलीची सांगता केली.विलास शिंदे यांचा गौरवमध्यंतरादरम्यान सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे प्रवर्तक विलास शिंदे यांचा शाहू खैरे यांच्या हस्ते संस्कृती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. संस्कृती सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असते. त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचाही शाहू खैरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन आमदार हेमंत टकले यांनी केले. नाशिकच्या शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाला शेवटपर्यंत जागणार असल्याची ग्वाही विलास शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Diwaliदिवाळीcultureसांस्कृतिक