शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

जर्मन आर्मीच्या तोफांनी ब्राझील धारातीर्थी

By admin | Updated: July 10, 2014 01:03 IST

जर्मन आर्मीच्या तोफांनी ब्राझील धारातीर्थी

  २० व्या विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीचा उपान्त्य सामना बघायला मिळाला. आजच्या सामन्याचा स्कोअर बघता जागतिक क्रमवारीत पहिल्या दोन-पाच मधला संघ आणि १००रीच्या पुढे असणारा संघ यांच्यात जो स्कोअर असू शकतो तशा पद्धतीचा सामना या दोन दिग्नज संघांमध्ये बघायला मिळेल, अशी कोणीही अपेक्षा केली नव्हती. या अनपेक्षित निकालाने सर्व तज्ज्ञांचे अंदाज तर चुकवलेच; परंतु या सामन्यावर निम्या-निम्या विजयाची शक्यता गृहीत धरून ब्राझीलवर पैसे लावलेल्या तमाम सट्टेबहाद्दरांनाही जबरदस्त आर्थिक फटका बसला असणार आहे. ब्राझील-अर्जेंटिना या फुटबॉलमधील महानशक्ती आहेत. विश्वचषकामध्ये सर्वाधिक यश या दोघांच्याच नावावर आहे. या सर्वांचा विचार करता हा सामना म्हणजे अगदी काट्याची लढाई असणार आहे आणि आपल्याला या सामन्यामधून अगदी टोकाचा संघर्ष बघायला मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र ज्या पद्धतीने जर्मन आर्मीने ब्राझीलची शिकार केली ते बघता आजचा दिवस ब्राझीलसाठी नव्हताच असे म्हणावे लागेल. या दिवसाची आठवण आता त्यांना कधीही येऊ नये असेच वाटत असणार. ब्राझीलची आश्वासक सुरुवात - हा सामना सुरू होण्याआधी नॅशनल अ‍ॅथमचे वेळी ब्राझीलचे खेळाडू डेव्हिड लुईस आणि हल्क यांनी नेमारची १० नंबरची जर्सी दाखवून आपण या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत आणि विजयासाठीच खेळणार हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि सामना सुरू झाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांचा खेळ बघता ब्राझीलच्या खेळाडूंची ती मानसिकता दिसूनही आली. सुरुवातीपासूनच जोरदार हल्ले करत त्यांनी आपले इरादे स्पष्ट करत खेळाला सुरुवात केली; मात्र त्यांनी या प्रयत्नात खेळाची गती इतकी वाढवली की, त्याच गतीने त्यांच्यावर प्रती आक्रमण झाल्यास काय करायचे याचे उत्तर ते देऊ शकले नाही. नेमारची दुखापत आणि कर्णधार थिएगो सिल्व्हाचे सस्पेंशन यामुळे आधीच विचारात पडलेल्या ब्राझीलचे प्रशिक्षक लुईस फिलीप स्कोलरी यांनी नेमारच्या जागी चेल्सीकडून खेळणाऱ्या विल्यनला संधी देण्याऐवजी बर्नार्डला संधी दिली आणि थिएगो सिल्व्हाच्या ऐवजी बचावासाठी बार्सिलोनाचा डॅनी अल्वेस हा योग्य पर्याय असतानाही एकही सामना न खेळलेल्या बायन म्युनीकच्या डेेंटे याला फुलबॅक म्हणून खेळवले. अर्थात डेंटे हा जर्मन लिग स्पर्धेत खेळत असल्यामुळे त्याला या लिगमध्ये खेळणाऱ्या जर्मनच्या बहुतेक खेळाडूंचा खेळ माहीत असल्यामुळे स्कोलरी यांनी डेंटेला पसंती दिली असावी; मात्र हे सर्वच त्यांच्यावर बूमरँग झाले. जर्मनीचा धडाका - जर्मनीचा संघ हा कायमच संयमाने खेळ करतो. एकदम आक्रमक होण्यापेक्षा सामन्यात सर्व खेळाडूंना एकरुप होऊ देतो आणि नंतर सर्व काही सुरळीत चालल्यानंतरच प्रतिहल्ला करतो. त्याचप्रमाणे या सामन्यातील ब्राझीलची सुरुवात बघता जर्मनीने संयमाची भूमिका घेत आपल्या सर्व खेळाडूंना आपापल्या जागी स्थिरस्थावर होऊ दिले आणि त्यानंतर प्रतिहल्ल्याला सुरुवात करत ११व्या मिनिटाला काउंटर अ‍ॅटॅकमध्ये कॉर्नर मिळविला. ब्राझीलच्या थिएगो सिल्वाने या आधीच्या उपउपान्त्य सामन्यामध्ये जसा कॉर्नरवर गोल केला अगदी तशीच तत्परता जर्मनीच्या थॉमस मुल्लरने दाखवली आणि सर्व खेळाडूंच्या डोक्यावरून मागे आलेल्या किकचा अचूक अंदाज घेत जर्मनीची पहिली तोफ डागली. या गोलमुळे आपल्या खेळाडंूना अगदी बेंबीच्या देठापासून प्रोत्साहन देणाऱ्या स्टेडियममधील ब्राझीलच्या पाठीराख्यांमध्ये एकदम शांतता पसरली. थॉमस मुल्लरचा हा या स्पर्धेतील पाचवा गोल होता आणि त्याने विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर असणारा आपला ज्येष्ठ सहकारी मिलोस्लाव क्लोस याचीही जर्मनीकडून एका विश्वचषकामध्ये पाच गोल करण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. विश्वचषकामध्ये सर्वाधिक १५ गोलची ब्राझीलच्या रोनाल्डोशी बरोबरी करणाऱ्या ३६ वर्षीय क्लोसने या सामन्यात संधी साधली. मुल्लरनेच दिलेल्या पासवर त्याने गोलमध्ये लगावलेला शॉट कसाबसा अडवणाऱ्या ज्युलिओ सेझारच्या हाताला लागून रिबाउंड आलेल्या चेंडूला पुन्हा गोलच्या कोपऱ्यात प्लेस करून मिलोस्लाव क्लोसने १६ वा गोल करत विश्वविक्रम आपल्या नावावर केला. यावेळी हा विश्वविक्रम नावावर असणारा रोनाल्डो या सामन्याची कॉमेंट्री करत होता. हे दोन गोल कसे झाले याचा विचार करता करताच जर्मनीचा आणखी एक हल्ला झाला. मेसुट ओझेलने फिलीप लॅमकडे पास केलेला चेंडू त्याने टोनी कॉस याच्याकडे दिला. कॉसने क्षणचाही विलंब न लावता चेंडूला गोलमध्ये टाकत हे वर्तळ पूर्ण केले. लागलीच दोन मिनिटांनंतर टोनी कॉसने दिलेला पास खेदेरीने पुन्हा उलटा त्याच्याकडे दिला. त्यावर पुन्हा किक लगावत कॉसने आपला दुसरा आणि जर्मनीचा चौथा गोल केला. तीनच मिनिटांनी याचीच पुनरावृत्ती झाली. आता वेळ होती खेदेरीची. कॉसने मायनस दिलेल्या पासवर खेदेरीनेही तसाच फटका लगावत जर्मनीचा पाचवा गोल केला. ही सततची गोलची बरसात पाहून मध्यंतराचा वेळ कधी संपतो, अशी ब्राझीलची अवस्था झाली होती. कारण त्यांच्याकडून चेंडू जर्मनीच्या मैदानात जातच नव्हता आणि जर्मनीचा गोली मॅन्युएल नेउरे याला प्रेक्षकांची भूमिका मिळाली होती. मध्यंतराच्या विश्रांतीनंतर उत्तरार्धात ब्राझीलने पुन्हा आक्रमक सुरुवात केली आणि आॅस्कर, मायकॉन, पावलान्हो यांनी काही चांगले प्रयत्न केले; मात्र त्यांना जर्मनीचे बचावपटू हॉवर्ड, मॅटस् हयुमेल्स जेरमी बोएटिंग यांच्याबरोबरच गोली मॅन्युुएल नेउरे यांनी दाद लागू दिली नाही. दरम्यान, जर्मनचे प्रशिक्षक जोकीम लुई यांनी गोलचे रेकॉर्ड करणाऱ्या मिलोस्लाव क्लोसच्या ऐवजी आंद्रे शुलरला मैदानात उतरवले. त्यानेही मागे न रहाता पुन्हा लॅमच्या पासवर आपल्या उजव्या पायाने किक लगवात जर्मनीचा सहावा गोल करत पूर्वार्धातील हा गोलचा सिलसिला सुरूच ठेवला. त्यानंतर १० मिनिटांनी पुन्हा कॉर्नरच्या जवळून थॉमस मुल्लरने आतमध्ये लॉफट केलेला चेंडूचा ताबा घेत यावेळी शुलरने आपल्या डाव्या पायाने जोरदार किक लगावली, ती किक गोलच्या खांबाला लागून ब्राझीलच्या गोलमध्ये विसावली आणि जर्मनीने विक्रमी विजय मिळवत अंतिम फेरी गाठत आपल्या चौथ्या विश्वविजेतेपदाकडे आश्वासक पाऊल टाकले आणि २००२ मध्ये अंतिम फेरीत ब्राझीलकडून झालेल्या २-० अशा पराभवाची सव्याज परतफेडही केली. ब्राझीलने गोलसाठी केलेल्या प्रयत्नांना शेवटच्या मिनिटात यश आले आणि आॅस्करने गोल करत ब्राझीलच्या नावावरही एक गोलची नोंद केली इतकेच. ब्राझीलचा हा पराभव एकंदरीतच त्यांच्या फुटबॉल वाटचालीतील सर्वांत मोठा पराभव ठरलेला आहे. तसेच विश्वचषकांचा इतिहास बघता यजमान संघाने शक्यतो विजेतेपद मिळविलेले आहे किंवा यजमानांची कामगिरी तरी आधीच्या पेक्षा चांगली झालेली आहे; मात्र ब्राझीलला आपल्या घरच्या प्रेक्षकांंसमोर हा दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने सर्वत्र नाराजी आणि निरुत्साही वातावरण पहायला मिळत आहे.