शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

सर्वसाधारण गणावर नेत्यांची मदार!

By admin | Updated: February 9, 2017 23:14 IST

चुरशीची लढत : इंधन कंपन्यांमुळे आली सुबत्ता

 गिरीश जोशी मनमाडतालुक्यातील भालूर गटातील पानेवाडी गण सर्वसाधारण झाल्याने हिरमोड झालेल्या गटातील नेतेमंडळींची मदार पानेवाडी गणावर असल्याचे दिसून येते आहे. इंधन कंपन्यांमुळे सुबत्ता आलेल्या तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायतींचा समावेश या गणात असल्याने पानेवाडीवर वर्चस्व राखण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.इंधन कंपन्यांमुळे नावारूपास आलेला पानेवाडी हा गण सर्वसाधारण आहे. या गणात १७ हजार १३९ मतदार असून, गणामध्ये पिंप्राळे, वाखारी,नांदूर, पारेकरवाडी, कोंढार, दऱ्हेल, बोयेगाव, भार्डी, धनेर, नवसारी, खादगाव, अस्तगाव, पांझणदेव, धोटाणे खुर्द, धोटाणे बुद्रुक, पानेवाडी, हिरेनगर या गावांचा समावेश होतो. २०१२च्या निवडणुकीचा अपवाद वगळता अनेक वर्षांपासून या गणावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. पानेवाडी गणाने नांदगाव पंचायत समितीला बाबूराव हाके, रतन लहिरे व सुरक्षा केसकर हे तीन सभापती दिले आहेत.१९७५ साली आजच्या पानेवाडी गणातील के. टी. खरे यांनी या गणाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी मनमाड शहरातील जुना नागापूर रोड, गर्डर शॉप, बुरकुल वाडीचा काही भाग जि. प. हद्दीत होता. त्यामुळे मनमाड येथील रहिवाशाने पंचायत समितीची निवडणूक लढवण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. त्यानंतर १९७९ साली बाबूराव हाके यांच्या रूपाने आजच्या पानेवाडी गणातील सदस्याला प्रथमच नांदगाव पंचायत समितीच्या सभापतिपदाची संधी मिळाली होती. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीचे सभापती होता येत होते. १९८० रोजी झालेल्या निवडणुकीनंतर तब्बल बारा वर्षे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नाही. या काळात बाबूराव हाके यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले होते. नाशिक जि. प. च्या बांधकाम समिती सभापतिपदाची जबाबदारी हाके यांनी सांभाळली होती.त्यानंतर शिवसेनेचे दशरथ लहिरे (२००२), बाळासाहेब आव्हाड (२००७), राष्ट्रवादीच्या सुरक्षा केसकर (२०१२) या सदस्यांनी पानेवाडी गणाचे प्रतिनिधित्व केले. २००७ साली जामदरी गटाचे नाव बदलून भालूर गट असे करण्यात आले. यामध्ये भालूर व पानेवाडी या दोन गणांचा समावेश आहे.पानेवाडी गण सर्वसाधारण आहे. सुरुवातीच्या काळात अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होते; मात्र भालूर गट व गणातील आरक्षणामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाल्याचे पाहावयास मिळाला. पानेवाडी गट सर्वसाधारण असल्याने सर्व नेत्यांची मदार या गणावर आहे. गेल्या काही वर्षांपासून पानेवाडी गण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकीच्या वेळी तालुक्यात भुजबळ यांचे वर्चस्व होते. भालूर गटात व गणात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असले तरी पानेवाडी गणात मात्र राष्ट्रवादीच्या सुरक्षा केसकर यांनी शिवसेनेच्या विमलबाई आव्हाड यांचा पराभव करून विजय संपादन केला होता.शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून या निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात येत आहे. सर्व राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन खलबते सुरू केली आहेत.