शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मिळावा करदिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 01:21 IST

केंद्र सरकारने अलीकडेच म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे आता काही फार मोठे बदल सरकार करेल, असे वाटत नाही. मात्र, कराच्या कक्षा रुंदावण्यासाठी करसुभलता केली पाहिजे,

अर्थसंकल्पाकडून अपेक्षानाशिक : केंद्र सरकारने अलीकडेच म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे आता काही फार मोठे बदल सरकार करेल, असे वाटत नाही. मात्र, कराच्या कक्षा रुंदावण्यासाठी करसुभलता केली पाहिजे, तर कराच्या कक्षेत नागरिक आनंदाने सहभागी होतील. त्याचप्रमाणे सर्वसामान्य तसेच नोकरदार करदात्यांना अधिक सवलत सरकारने द्यावी, अशा विविध सूचना शहरातील सनदी लेखापालांनी केल्या.कार्पोरेट टॅक्स कमी व्हावाकेद्र सरकारने अलीकडेच अंतरिम अर्थसंकल्प केला होता. त्यामुळे त्यात आता फार मोठे बदल होतील असे वाटत नसले तरी शेअरसंदर्भात गेल्यावर्षी सरकारने लॉँग टर्म कॅपिटल गेन १० टक्के केला होता. त्यात बदल होण्याची शक्यता आहे. विशेषत: हा कर १० टक्के म्हणजे जास्त असल्याने तो कमी केला पाहिजे. त्याचबरोबर कार्पोरेट टॅक्सदेखील कमी करण्याची अपेक्षा आहे, तो खूप आहे. या दोन मुद्द्यांवर सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.  - हर्षल सुराणा, अध्यक्ष, आयसीएआयनोकरदारांना करसवलत मिळावीसर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय म्हणजे आयकराचा स्लॅब वाढविणे होय. केंद्राच्या अंतरिम अर्थ संकल्पात यासंदर्भात सरकारने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर मग अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नापासून कर भरावा लागतो. त्यामुळे स्लॅब वाढविला तर त्यामुळे करदात्यांची संख्या वाढेल आणि त्याचा फायदा सरकारच्या उत्पन्नवाढीत होईल. नोकरदारांना वजावट मिळत नाही. नोकरदारांना चाळीस हजार रुपयांपर्यंत स्टॅँडर्ड डिडक्शनची सोय केली असली तरी चाळीस हजार रुपये ही फार कमी रक्कम असून ती वाढविण्याची गरज आहे.  - विकास हासे, माजी अध्यक्ष सनदी लेखापाल संघटना‘वेल्थ टॅक्स’चा विचार व्हावाकेद्र सरकारने याआधीच अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे त्यात आता फार मोठे बदल होईल असे वाटत नाही. मात्र सरकारने करप्रणाली सुलभ केली पाहिजे. तसे केल्यास करदात्यांची संख्या वाढेल. त्याचप्रमाणे सरकार उत्पन्न वाढीसाठी काही ना काही उपाय शोधत असेलच. मध्यंतरी वेल्थ टॅक्स चर्चेत होता. परंतु तो लागू झाला नाही. परंतु ज्यामुळे संपत्ती निर्माण होते अशा रियल इस्टेट किंवा सोनेसारखी वस्तू आहे त्याच्या एकदाच्या खरेदीनंतर सरकारला काहीच लाभ होत नाही. त्यामुळे असे लोक कराच्या कक्षेत आणण्याची चर्चा सुरू होती. काही कारणाने सरकारला निर्णय घेता येत नसेल तरी अशाप्रकारची कर लागू केल्यास उत्पन्न वाढू शकेल असे माझे व्यक्तिगत मत आहे.  - तुषार पगार, सनदी लेखापालजीएसटीमध्ये सुटसुटीतपणा आणावाकेद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना करदात्यांचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. जीएसटीमधील गुंतागुंत कमी करून सुटसुटीतपणा आणण्याची गरज आहे. जीएसटी रिटर्न्समध्येदेखील रिव्हीजनची सुविधा दिली पाहिजे. त्याचबरोबर आयकर, किंवा आयकर परतावा, आॅडिट भरण्यासाठी सरकार मुदत देत असते. परंतु मुदत उलटून गेल्यानंतर लागणारा दंड एकदम न आकारता प्रतिदिन आकारण्यात यावा तसेच दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोकड भरल्यास शेतकरी वर्गालादेखील आयकर विभाग नोटिसा पाठवते, ते टाळावे.  - राजेंद्र शेटे, सरचिटणीस, आयसीएआयसर्व लाभांश करमुक्त करावेतकेद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशाप्रकारचे निर्णय अपेक्षित आहेत. विशेषत: सर्व प्रकारचे लांभाश, मग ते बॅॅँकेच्या ठेवी असो अथवा शेअर्समधील गुंतवणुकीवर असोत परंतु ते करमुक्त झाले पाहिजेत. त्यामुळे शेअर्स मार्केट गुंतावणुकीकडे ओढा वाढेल. त्याचप्रमाणे गृहकर्ज घेतल्यास आयकरात सवलत देण्याची तरतूद आहे. कर्ज परतफेडीची मुद्दल आणि व्याजवरील वजावटीची मर्यादादेखील वाढविली पाहिजे. रियल इस्टेटमध्ये अनेकदा सरकारी मूल्यांकन आणि बाजारभाव यांच्यात तफावत असते. बाजारभाव हे कमी असले की त्यातून वाद वाढत जातात. त्यामुळे अशी तफावत कमी करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. - घनश्याम येवला, सनदी लेखापाल

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पNashikनाशिक