शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

आकडेवारीच्या घोळावरून गाजली पालिकेची महासभा

By admin | Updated: July 9, 2014 00:33 IST

आकडेवारीच्या घोळावरून गाजली पालिकेची महासभा

 

नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात महासभा आणि प्रभाग समितीने मंजूर केलेल्या कामांच्या याद्या आणि त्याची रक्कमच धरली नसल्याचा प्रकार विरोधकांनी उघड केल्यानंतर त्याची सारवासारव करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली. दरम्यान, पालिकेच्या दुर्लक्षाचे आणि उधळपट्टीवर लोकल फंड आॅडिटमधील अनेक गंभीर प्रकारही उघड करण्यात आले.फेब्रुवारी महिन्यात पालिका आयुक्तांनी स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केले. त्यात पालिकेचे दायित्व स्पष्ट करताना निविदा काढलेली कामे, निविदा मंजूर परंतु कार्यारंभ आदेश न दिलेली कामे अशा अ ब क ड याद्यांचा उल्लेख होता. परंतु यापूर्वीच्या अंदाजपत्रकात ज्याप्रमाणे महासभा आणि प्रभाग समित्यांनी मंजूर केलेल्या कामांचा ई याद्यांमध्ये समावेश असतो तोच नेमका नाही. परंतु निवेदनात मात्र उल्लेख करण्यात आल्याने सुमारे अडीचशे कोटी रुपयांची तूट येत असल्याचा आरोप अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी केला, तसेच अन्य घोळही मांडले. सुरुवातीला हे घोळ मांडल्यानंतर लेखापाल राजेश लांडे यांना खुलासा करू द्यावा, ही शहाणे यांची मागणी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मान्य केली नाही. उद्धव निमसे यांनी हाच विषय लावून धरला आणि खुलाशाची मागणी केली. यावेळी लेखापाल राजेश लांडे यांनी निवेदनात ई याद्या धरण्याची गरज नाही, कारण अंदाजपत्रकात मंजूर कामांच्या याद्या जोडल्या असल्याचे सांगितले. तथापि, निमसे यांनी मंजूर कामांची यादी सादर केली आणि ती अंदाजपत्रकात शोधून देण्याचे आव्हान दिले. तेव्हा खातेप्रमुखांनी दिलेल्या याद्या घेण्यात आल्या, असे सांगून लांडे यांनी जबाबदारी झटकली. त्यानंतर शहराध्यक्ष सुनील खुने यांनी ही कामे विविध शीर्षाखाली धरण्यात आली असल्याचे सांगून सारवासारव केली. तसेच राहिलेल्या कामांची दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावर लांडे यांनी पंधरा दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देऊन सभागृह सोडले. यावेळी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी आपल्याच पक्षाचे नगरसेवक शिवाजी सहाणे यांचा नामोल्लेख न करता आयुक्तांचे अंदाजपत्रक चुकीचे असेल तर स्थायी समितीत रोखायला हवे होते; परंतु तेथे मात्र सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या करतात आणि आता येथे विरोध करतात, असा टोला लगावला. तसेच लांडे यांचे समर्थन केले.यावेळी लोकल फंडाने पालिकेच्या अंदाजपत्रकावर घेतलेले आक्षेप गुरुमित बग्गा यांनी उघड केले. पालिका तीन वर्षांपासून फुगीर अंदाजपत्रक सादर करीत असून, त्यामुळे पालिका आर्थिक डबघाईच्या उंबरठ्यावर असल्याचा आक्षेप त्यांनी दाखवला. पालिकेत सत्कारासाठी एक रुपयाचा खर्च शासनाने अनुज्ञेय करीत असताना जनसंपर्क विभाग वीस लाख आणि नगरसचिव विभाग पाच-पाच लाख रुपये खर्च करीत असल्याचे त्यांनी सांगितले, तर खानपानासाठी साठ-साठ लाख रुपयांच्या येणाऱ्या खर्चाच्या उधळपट्टीवरही लेखापरीक्षणात आक्षेप असल्याचे नमूद केले. चर्चेत लक्ष्मण जायभावे, कल्पना पांडे, प्रा. देवयानी फरांदे, रंजना पवार, अशोक मुर्तडक, विलास शिंदे, संजय चव्हाण यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)