शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापितांच्या पुनर्वसनावरून सभा गाजलीयेवला पालिका : विविध समस्यांवर सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:35 IST

येवला पालिका : विविध समस्यांवर सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क येवला : विस्थापितांचे पुनर्वसन करण्यास प्राधान्य द्या, रस्त्यांची कामे करा, पथदीप पूर्ववत सुरू करा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केल्याने ेपालिकेची सभा चांगलीच गाजली.नगरसेविका शीतल शिंदे, सरोजिनी वखारे यांनी आक्रमक भूमिका मांडली. ४४ विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. गुरु वारी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सूरज पटणी, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर होते. कॉलनी भागातून सर्वाधिक महसूल मिळतो. या भागातून नागरिकांचा मोर्चा आला तरीही सांगितलेले कोणतेही काम होत नाही. घरात पावसाचेपाणी येते. यातून मार्ग काढावा. पावसाळापूर्व तयारी पालिकेने केली नाही. रस्त्यावर खड्डे झाले, असा आरोप शीतल शिंदे यांनी केला. खुल्या जागांचा विकास करण्याची मागणी सरोजिनी नगरसेविका वखारे यांनी केली. या प्रश्नावर नगरसेवक रुपेश लोणारी, प्रवीण बनकर,अजय जैन, सचिन मोरे, झामभाऊ पहिलवान यांनी उपप्रश्न विचारले. खड्डे भरले जातील, असे आश्वासन मुख्याधिकारी मेनकर यांनी दिले. शहरात व नव्या वसाहतीत स्वच्छता होत नाही.सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे.रस्त्यावर सर्वत्र कचरा पडला आहे. नालासफाई झाली नाही याचे फोटोच नगरसेवक सचिन मोरे यांनी दाखवले. यावर केवळ १०० सफाई कर्मचारी आहेत, घंटागाडीची संख्या कमी आहे, स्वच्छता करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उत्तर स्वच्छताप्रमुखांनी दिले. अस्वच्छतेबाबत नगरसेवक शफिक शेख, रु पेश लोणारी यांनी नापसंती दिर्शवली. नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेले पथदीप पालिकेने टोल कंपनीकडून ताब्यात घ्यावेत, असे नगरसेवक रु पेश दराडे यांनी सुचवले. पथदीपासाठी पोल उभारले पण दिव्याचा पत्ताच नाही अशी स्थिती शहरात दिसत आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला.बांधकाम विभागाकडून कोणती कामे चालू आहेत याची माहिती सचिन शिंदे, रुपेश लोणारी यांनी केली. बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेली दवाखान्याची जागा पुन्हा पालिकेकडे घ्यावी या प्रस्तावावर बोलताना रा.कॉ. गटनेते डॉ. संकेत शिंदे यांनी जागेवर शिवसृष्टीचे निर्माण प्रस्तावित असून, निधी मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे सुचवले.विस्थापितांचे पुनर्वसन करा गाळ्यांच्या लिलावाबाबतच्या विषयावर डॉ. संकेत शिंदे यांनी विस्थापित झालेल्या गाळेधारकांचे पुनर्वसन अगोदर करावे, अशी मागणी करीत प्रस्तावच सादर केला. गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे पुनर्वसन शक्य आहे. हवे तर राष्ट्रवादी या प्रश्नावर साथ द्यायला तयार आहे. पुनर्वसन नाही तर लिलाव नाही, अशी भूमिका डॉ. शिंदे यांनी घेतली. भटक्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त या प्रश्नावर बोलताना नगरसेवक रु पेश लोणारी आणि प्रवीण बनकर यांनी भटकी कुत्री पकडून बाहेर सोडण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकारी यांनी कुत्री पकडण्यासाठी निविदा काढूनही कोणीही पुढे येत नसल्याचे सांगितले.