शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आले साहेबाच्या मना...!

By admin | Updated: December 3, 2015 22:41 IST

मनमाड : जिल्हाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने नागरिकांचा हिरमोड

मनमाड : गिरणाडॅम येथे बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी मनमाड शहराला भेट देणार असल्याने पालिकेच्या वतीने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र पाणी टंचाई, आरोग्य,रस्ते आदी समस्यांनी त्रस्त झालेले मनमाडकर जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचन्यासाठी ताटकळत पाच तास वाट पहात असताना त्यांचा दौरा रद्द झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. आले साहेबाच्या मना...तेथे कोणाचे चालेना ...याचा प्रत्यय आज मनमाडकरांनी अनुभवला.नाशिकचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशावह हे आज गुरुवारी नांदगाव तालुक्यात गिरणाडॅम येथील बैठक आटोपून मनमाड शहराला भेट देण्याचे नियोजन होते. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पालिकेने केलेले काम तसेच आरोग्य , पाणीटंचाई , रस्ते आदी कामांचा आढावा ते घेणार होते.साहेबांच्या आगमनामुळे शहरातील पालिका परिसरातील रस्ते चकाचक झाले होते.गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई ,स्वच्छता व आरोग्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या मनमाडकरांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या वृत्तामुळे दिलासा मिळाला . आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी नागरिकांसह काही पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या प्रतिक्षेत होते.शहरातील अतीक्रमणे , पालखेडच्या पाण्याच्या रोटेशनची मागणी आदी समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात येणार होती.तब्बल पाच तासांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा रद्द झाल्याचे समजल्याने मनमाडकरांचा हिरमोड झाला. (वार्ताहर)