पिंपळगाव बसवंत : येथील गोरक्षकांनी वसूबारसनिमित्त आजारी गायींवर उपचार करून त्यांची सेवा केली. येथील बजरंग दल व गोरक्षकांनी शहरातील डझनभर गायींच्या पायाच्या वाढलेल्या खुरा कापून दिवाळीच्या वसूबारसनिमित्त गायींना अनेक महिन्यांपासून होणाºया चालण्याच्या त्रासातून मुक्त केले. गोरक्षक संजय सोनवणे (बजरंग दल) यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंद सोनवणे, विजय चोपडे, गणेश खोडे, सागर कस्तुरे, श्यामराव विधाते, संतोष गावित आदींनी शहरातील या पायाची खुरे वाढलेल्या मोकाट गायींना शोधून काढले. त्याच ठिकाणी त्यांना कुठलीही इजा होऊ न देता वाढलेल्या पायाच्या खुरा कापून काढल्या. शनिवारी पावसाची तमा न बाळगता या गोरक्षकांनी गोमातेची पूजा केली.
गोरक्षकांकडून वसूबारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:26 IST