शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गौस-ए-आझम स्मृतिदिन मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:13 IST

सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी ऊर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक, वडाळागाव परिसरातून बुधवारी (दि.१९) ‘जुलूस-ए-गौसिया’ची मिरवणूक काढण्यात आली.

नाशिक : सुफी संत हजरत शेख अब्दुल कादिर जिलानी ऊर्फ गौस-ए-आझम यांच्या स्मृतिदिनानिमित्त जुने नाशिक, वडाळागाव परिसरातून बुधवारी (दि.१९) ‘जुलूस-ए-गौसिया’ची मिरवणूक काढण्यात आली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली गौस-ए-आझम यांच्या स्मृतिदिनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चौक मंडई येथील जहांगीर मशिदीपासून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी खतीब यांनी प्रार्थना करत संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली. यावेळी मौलाना महेबूब आलम, मौलाना रहेमत उल्ला मिस्बाही, मौलाना वासिक रजा, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, एजाज काझी, एजाज रजा मकरानी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांनी उपस्थित धर्मगुरूंचे स्वागत केले. मिरवणूक बागवानपुरा, कथडा, शिवाजी चौक, चव्हाटा, नाईकवाडीपुरा, काजीपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौक, पिंजारघाटमार्गे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली.मिरवणुकीमध्ये दारुल उलूम सादिकुलउलूम, मदरसा गौस-ए-आझमचे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर हिरवे ध्वज, पताका लावून सजावट करण्यात आली होती. तसेच ठिकाठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. खडकाळी परिसरातील सजावट लक्षवेधी ठरली. सहभागी समाजबांधव धार्मिक काव्य पठण करत मिरवणुकीत संचलन करतहोते. दरम्यान, मीर मुख्तार हे अग्रभागी राहून गौस-ए-आझम यांच्या जीवनकार्याविषयी माहिती ध्वनिक्षेपकावरून देत होते.बडी दर्गाच्या आवारात दरुदोसलाम व फातेहा पठण करून संध्याकाळी सहा वाजता मिरवणुकीची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम