शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पाचदिवसीय गणपतींसह  गौरींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 01:20 IST

नाशिक : गणेशोत्सव रंगात आला असून, शहरात विविध सार्वजनिक मंडळांकडून धार्मिक-पौराणिक व सामाजिक देखावे सादर करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाचा सोमवारी (दि.१७) पाचवा दिवस होता. काही नागरिकांनी पाच दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पांसह गौरींनाही भावपूर्ण निरोप दिला.गणरायाचा उत्सव नाशिककरांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त शहरात ...

नाशिक : गणेशोत्सव रंगात आला असून, शहरात विविध सार्वजनिक मंडळांकडून धार्मिक-पौराणिक व सामाजिक देखावे सादर करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाचा सोमवारी (दि.१७) पाचवा दिवस होता. काही नागरिकांनी पाच दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पांसह गौरींनाही भावपूर्ण निरोप दिला.गणरायाचा उत्सव नाशिककरांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त शहरात मंगलमय वातावरणाची निर्मिती झाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. शहराच्या कानाकोपऱ्यातून बाप्पांच्या विविध भक्तिगीतांसह आरतीचा आवाज संध्याकाळी कानी पडत आहे. यामुळे वातावरणात प्रसन्नता जाणवू लागली आहे. गणरायाचा उत्सव यंदा अकरा दिवस असला  तरी परंपरेनुसार काही भाविकांच्या घरी दीड दिवस, पाच दिवसांकरिताही बाप्पा विराजमान झाले होते. अशा नागरिकांनी सोमवारी विधिवत बाप्पांच्या मूर्तीची आरती करून पाण्यात विसर्जन केले. यावेळी शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, पंडित कॉलनी, सिडको, इंदिरानगर आदी भागांमध्ये बहुतांश गणेशभक्तांनी मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करत दान केले. शहरातील गंगापूररोड जवळील हनुमानवाडी लिंकरोडच्या पुलाला लागून गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाकडून गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आला होता. यावेळी बहुतांश नागरिकांनी संकलनाला चांगला प्रतिसाद देत मूर्तींचे दान करणे पसंत केले. यामुळे गोदामाईचे जलप्रदूषण रोखण्यास काही प्रमाणात मदत झाली. तसेच पंडित कॉलनीमध्ये लायन्स क्लबकडूनदेखील मूर्ती संकलन करण्यात आले. लायन्स क्लब सभागृहात संस्थेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे स्वागत करत प्रतिसाद दिला.शाळा-महाविद्यालयांमध्ये उत्साहशहरातील बहुतांश शाळा-महाविद्यालयांमध्ये पाचदिवसीय गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लोषात शाळेच्या आवारातून मिरवणूक काढत वाजतगाजत लाडक्या बाप्पांना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घातली. यावेळी विद्यार्थ्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती