शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गौरव गिल ठरला विजेता

By admin | Updated: June 16, 2014 01:03 IST

नाशिक : महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रॅली आॅफ महाराष्ट्रच्या इंडियन रॅली चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचा विजेता अपेक्षेप्रमाणे दिल्लीचा गौरव गिल - मुसा शरीफ ही जोडी ठरली.

 

नाशिक : महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रॅली आॅफ महाराष्ट्रच्या इंडियन रॅली चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीचा विजेता अपेक्षेप्रमाणे दिल्लीचा गौरव गिल - मुसा शरीफ ही जोडी ठरली. शंभर सेकंदाची शिक्षा मिळूनही त्याने गतविजेत्या अमितरजित घोषवर आघाडी घेत पहिल्या फेरीच्या विजेत्या पदाला गवसणी घातली. दरम्यान, स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या नाशिककर धीवर बंधूंनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी नोंदविली. गेल्या शुक्रवारपासून विसा आयोजित महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रॅली आॅफ महाराष्ट्रच्या पहिल्या फेरीला सुरुवात झाली. फाळके स्मारकात पहिली स्टेज झाल्यानंतर शनिवारपासून सिन्नर - घोटी - अकोला परिसरातील सह्णाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्पर्धा पार पडली. पहिल्या दिवसाच्या सहा स्टेजमध्ये गतविजेता कोलकात्याचा अमितरजित घोष व विजेतेपदाचा प्रबळ दावेदार गौरव गिल यांच्यामध्ये चुरस दिसून आली. अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने गौरव गिलने पहिल्या दिवसावर वर्चस्व मिळविले, तर दुसऱ्या दिवशी गौरवनेच पुन्हा वर्चस्व राखत पहिल्या फेरीचे विजेतेपद मिळविले. त्याने सदर स्पर्धेचे अंतर एक तास २८ मिनिटे ३० सेकंदात पार करीत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळविला. अमितरजित घोष - अश्विन नाईकची जोडी दुसऱ्या स्थानी राहिली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अल्फा, बिटा आणि ग्यामाच्या प्रत्येकी दोन, तर रविवारी सकाळी पुन्हा या तीनही स्टेजेसची प्रत्येकी एक फेरी झाली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे गौरव गिलने वर्चस्व राखले. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने रस्त्यावरून वेगात गाडी हाकणे धोकादायक होते. तरी कोणतीही दुर्घटना वा गाडीला अपघात झाला नाही. हॉटेल गेट वे येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रंगला. यावेळी विजेत्यांना चषक व रोख रक्कम प्रदान करण्यात आली. विजेत्यांनी शॅपेन उडवून विजयोत्सव साजरा केला. यावेळी कठीण गेले : गौरव गिलस्पर्धेसाठी वापरलेली महिंद्रची गाडी पहिल्या गाडीपेक्षा वेगळी होती. त्यामुळे रुळायला जरा वेळ लागला पण मजा आली. स्पर्धेतील स्टेजेसही गेल्यावेळेपेक्षा कठीण वाटल्या. पण रॅलीत मजा आली आणि आनंद घेतला. सर्वोत्कृष्ट रॅलींपैकी ही एक रॅली आहे. स्पर्धेचा निकाल : सर्वसाधारण अव्वल : गौरव गिल/मुसा शरीफ, द्वितीय : अमितरजित घोष/अश्विन नाईक, तृतीय : बेराम गोदरेज/ए.जी. सोमय्या२००० सीसी गट : बेराम गोदरेज/ए.जी. सोमय्या (प्रथम), राहुल कंथराज/विवेक भट (द्वितीय), सुमीत पंजाबी/वेणूरमेश कुमार (तृतीय) १६०० सीसी गट : ऋषिकेश ठाकरसी/निनाद मिरजगावकर (प्रथम), शिरिष चंद्रन/निखिल पै (द्वितीय), धु्रव चंद्रशेखरन्/बी. रुपेश (तृतीय) १६०० सीसी गट : अनिरुद्ध रांगणेकर/अर्जुन मेहता (प्रथम), के.सी. आदित्य/के.एन. हरिष (द्वितीय), पराग धीवर/आदित्य धीवर (तृतीय)