शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गौराईचे कोठूरेत उत्साहात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 15:50 IST

निफाड : गौराई आली सोनपावलांनी असे म्हणत लाडक्या गौराईचे मंगळवारी कोठुरो आगमन झाले. तीन दिवसांची माहेरवासीख म्हणून गौराईचे स्वागत करण्यासाठी कोठुरे येथे महिला वर्गात उत्साह दिसून आला. आॅगस्ट महिन्यातील गौराईचे आगमन हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. गुरु वारपर्यत तीन दिवस गौरी गणपतीचा उत्सव चालणार आहे.

ठळक मुद्दे पारंपारिक थाटात गौरीचे पूजन करण्यासाठी महिलाची लगबग

निफाड : गौराई आली सोनपावलांनी असे म्हणत लाडक्या गौराईचे मंगळवारी कोठुरो आगमन झाले. तीन दिवसांची माहेरवासीख म्हणून गौराईचे स्वागत करण्यासाठी कोठुरे येथे महिला वर्गात उत्साह दिसून आला. आॅगस्ट महिन्यातील गौराईचे आगमन हा क्षण मांगल्याचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. गुरु वारपर्यत तीन दिवस गौरी गणपतीचा उत्सव चालणार आहे.चैतन्याच्या सोनपावलांनी सुख समृद्धी घेवून मंगलमय वातावरणात चैतन्य घेवून येणाऱ्या महालक्ष्मी गौरीच्या स्वागतासाठी सम्पूर्ण घर आतुरतेने वाट पाहत असते. गौरीची स्थापना हि घराण्याच्या परंपरेनुसार वेगवेगळ्याळ्या पद्धतीने केले जाते. गणेश चातुर्ठीमध्ये गणपती बाप्पा इतकेच गौरीच्या आगमनाला महत्व दिले जाते. माहेरवासीन म्हणून समजल्या जाणार्या गौरीचे थाटामाटात आगमन झाले.या उत्सवात श्री गणेशा प्रमाणेच गौरी समोर आरास करण्यात येते. गौरीला नटवून तठून मनोभावे पूजन केले जाते. नव्या साड्या, अंगभर दागिने, नथनी, मंगळसूत्र, कंबर पट्टा, राणीहार आदीसह दिवाळी प्रमाणे लाडू, करंजी,चकल्या, चिवडा, शंकरपाळे, पेढे, बर्फी, मिष्ठान्न पुरणपोळी सहित पक्वान्नाचे भरलेले भोजनाचे ताट, विविध प्रकारची मिठाई, श्रीफळ, फळे, आणि विवाहितेने भरलेली ओटी अशा पारंपारिक थाटात गौरीचे पूजन करण्यासाठी महिलाची लगबग दिसून आली. गौराई बसविण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आढळतात. काही ठिकाणी गौरी पाटावर मुखवटे तर काही उभ्या राहिलेल्या स्वरूपातील महालक्ष्मी आढळतात यासाठी लाकडी, लोखंडी धातूंचा उभे राहण्यसाठी वापर केला जातो. गहू, तांदूळ यांच्या राशी मांडतात. 

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी