शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानांची वाताहत, अतिक्रमणे

By admin | Updated: November 18, 2016 23:28 IST

दसक, मंगलमूर्तीनगर : पिण्याचे पाणी, स्वच्छतेचा प्रश्न ‘जैसे थे’ं

 मनोज मालपाणी  नाशिकरोडपूर्वीचा प्रभाग ३२, ३५ व उपनगरचा काही भाग, आगरटाकळी मळे परिसर मिळून नवीन प्रभागरचनेत प्रभाग १७ ची निर्मिती झाली आहे. पहिल्या चार पंचवार्षिकमध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी व रिपाइं पीपल्स, आठवले गटाचे प्राबल्य राहिले आहे. मात्र चालू पंचवार्षिकमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली होती.जेलरोड भीमनगरपासून दसक गावापर्यंत (डावी बाजू) व उपनगर, आगरटाकळीचा मळे परिसर जोडलेल्या नवीन प्रभाग १७ ची व्याप्ती मोठी आहे. कॉलनी, बंगले व दाट लोकवस्ती असलेल्या या प्रभागात कॅनॉलरोड जेलरोडपासून उपनगरपर्यंतच्या संपूर्ण झोपडपट्टीचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे शैलेश ढगे, मंगला आढाव, रिपाइं-सेना युतीच्या ललिता भालेराव व मनसेचे संपत शेलार निवडून आले होते. मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले संपत शेलार यांचे नगरसेवकपद पक्षांतरबंदी कायद्यानुसार रद्द करण्यात आल्यानंतर पोटनिवडणुकीत पूर्वाश्रमीच्या रिपाइंच्या सुनंदा मोरे या भाजपाच्या तिकिटावर निवडून येत पहिल्यांदाच जेलरोडमध्ये कमळ फुलले. जेलरोडला शिवसेनेची ताकद जास्त असली तरी राष्ट्रवादीचे दिनकर आढाव यांचा करिष्मा होता. मात्र गेल्या निवडणुकीत सेनेचे ढगे यांनी त्यांना पराभूत केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आढाव नुकतेच भाजपामध्ये दाखल झाले. जेलरोडला दाट लोकवस्ती असून, या भागातील भाजीबाजाराचा प्रश्न कुठल्याही लोकप्रतिनिधींनी व पक्षाने सोडविण्यात रस दाखविला नाही. त्यामुळे जेलरोडवर भरणारा अनधिकृत भाजीबाजार आता नवीन परिसरामुळे जेलरोड शिवाजी पुतळा व जुना सायखेडारोड होली फ्लॉवर शाळेजवळ भरू लागला आहे. काही भागातील पाण्याचा, स्वच्छतेचा प्रश्न आजही कायम आहे. ठिकठिकाणी मोकळ्या भूखंडावर उद्याने बनविण्यात आली. मात्र त्याकडे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्यांची वाताहत झाली आहे. जेलरोड, इंगळेनगर, शिवाजी पुतळा, इंदिरा गांधी पुतळा परिसरात अतिक्रमण वाढले आहे. नवीन प्रभाग १७ हा पहिल्यापासून कॉँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइंचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र यामध्ये शिवसेनेने व नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपानेदेखील प्रवेश मिळविला आहे. सध्याच्या प्रभाग ३२ मध्ये पहिल्या, दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये कॉँग्रेसकडून दिनकर आढाव विजयी झाले होते. २००२ला त्रिसदस्यीय पद्धतीत कॉँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले दिनकर आढाव, रंजना बोराडे व शिवसेनेचे कै. प्रकाश आढाव विजयी झाले होते. २००७ मध्ये द्विसदस्यीय पद्धतीत आघाडीचे दिनकर आढाव, माया दिवे निवडून आले होते. मात्र २०१२च्या निवडणुकीत दिनकर आढाव यांचा शिवसेनेचे शैलेश ढगे यांनी पराभव केला होता, तर सेनेच्या मंगला आढाव निवडून आल्या होत्या. तसेच सध्याच्या प्रभाग ३६चा ८० टक्क्यांहून अधिक भाग व उपनगर, आगरटाकळीतील काही भाग, मळे विभाग समाविष्ट झाला आहे. प्रभाग ३६ मध्ये विद्या निकम, ९७ मध्ये गणेश उन्हवणे, २००२ मध्ये गणेश उन्हवणे, निवृत्ती अरिंगळे, आशा गायकवाड विजयी झाले होते. २००७ मध्ये संजय भालेराव, २०१२ मध्ये ललिता भालेराव व संपत शेलार विजयी झाले होते. पोटनिवडणुकीत भाजपाच्या सुनंदा मोरे विजयी झाल्या आहेत.