शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टाकी फुटण्याच्या अफवेचा ‘पेट्रोल बॉम्ब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:18 IST

दूरच्या प्रवासात तुम्ही एखाद्या पेट्रोलपंपावर थांबून पंपचालकाला टाकी फूल करण्यास सांगितले आणि तुमच्या सोबत असलेल्या मित्राने टाक ी फूल करू नका स्फोट होईल, असे कधी सांगितले आहे का? आतापर्यंत असे कोणी सांगितले नसेल तर यापुढे नक्कीच कोणीतरी नेटिझन्स तुम्हाला ही गोष्ट सांगितल्याशिवाया राहणार नाही.

नाशिक : दूरच्या प्रवासात तुम्ही एखाद्या पेट्रोलपंपावर थांबून पंपचालकाला टाकी फूल करण्यास सांगितले आणि तुमच्या सोबत असलेल्या मित्राने टाक ी फूल करू नका स्फोट होईल, असे कधी सांगितले आहे का? आतापर्यंत असे कोणी सांगितले नसेल तर यापुढे नक्कीच कोणीतरी नेटिझन्स तुम्हाला ही गोष्ट सांगितल्याशिवाया राहणार नाही. कारण उन्हाळ्यात पेट्रोलची टाकी पूर्ण भरल्यास गॅस तयार होऊन तिचा स्फोट होऊ शकतो अशी भीती पसरविणारी पोस्ट सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. त्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले असले तरी संबंधित कं पनीने ही पोस्ट चुकीची व अनधिकृत असल्याचा खुलासा यापूर्वीच केलेला आहे.  सोशल मीडियावर इंडियन आॅइल कंपनीच्या नावाने मेसेज फिरत असून, यातून वाहनात कमाल मर्यादेपर्यंत इंधन भरू नये, असे आवाहन केले जात आहे. वाहनात पूर्ण क्षमतेने पेट्रोल भरल्यास इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊ शकतो, त्यामुळे केवळ अर्धीच टाकी पेट्रोल भरण्याचा व दिवसातून एकदा टाकीचे झाकन उघडून बंद करण्याचा सल्ला देतानाच असे करण्याने टाकीत तयार होणार गॅस बाहेर निघून जाईल, असेही सुचविण्यात आले असून हा संदेश नातेवाइकांसह सर्व परिचितांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वाºयाच्या वेगाने ही अफवा पसरत असून, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. परंतु, या अफवेत कोणतेही तथ्य नसून व्हायरल झालेली पोस्ट पूर्णपणे चुकीची आहे. तिच्याशी कंपनीचा संबंध नसल्याचे इंडियन आॅइलने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंप