शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

भरलेल्या सिलिंडरमधून गॅस चोरी : चौघांना अटक, 29 सिलिंडर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 14:22 IST

ज्वलनशील पदार्थ बाबतची कृती ही मानवी जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये पाइपच्या सहाय्याने गॅसची चोरी करत असल्याची कबुली

ठळक मुद्देअडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त गॅस सिलेंडर चोरी करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

पंचवटी : ग्राहकांना घरगुती सिलेंडर पोहोचविण्याचे काम करणाऱ्या परिसरातील भारत गॅस एजन्सीच्या वितरकाकडे काम करणाऱ्या चौघा डिलिव्हरी बॉयला आडगाव पोलिसांनी भरलेल्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून घरगुती वापराचे हजारो रुपये किमतीचे तब्बल  29 सिलेंडर तसेच गाडी असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल शनिवारी (दि.2) विडीकामगार नगर गंगोत्री विहार परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गॅस चोरी करणारे संशयित आडगाव शिवारातील अमृतधाम परिसरातील रहिवासी आहे.याबाबत आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, हवालदार मुनीर काजी, विनोद लखन विजय सूर्यवंशी वाल्मीक पाटील नकुल जाधव असे गंगोत्री विहार परिसरात गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला एक पिवळ्या रंगाची रिक्षा क्रमांक (एमएच 15 इजी 4779) संशयास्पद उभी असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली असता संशयित आरोपी राजेंद्र गजेंद्र उर्फ गजानन मोहिते, गजानन कैलास ढाले, मधुकर तुकाराम कोसे, आनंदा गजेंद्र उर्फ गजानन मोहिते सर्व राहणार विडीकामगार नगर सावित्रीबाई झोपडपट्टी अमृतधाम असे एका लोखंडी पाईपच्या सहाय्याने भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये ट्रान्सफर करत असल्याचे आढळून आले.ज्वलनशील पदार्थ बाबतची कृती ही मानवी जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये पाइपच्या सहाय्याने गॅसची चोरी करत असल्याची कबुली पोलिसांना दिली त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक कायदा वस्तू कलम 3 व 7 भादवि 285, 286 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली आहे. तपासात गॅस सिलेंडर चोरी करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आडगाव पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCylinderगॅस सिलेंडरPolice Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी