शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

उद्यान विभाग उरला नावापुरता

By admin | Updated: September 23, 2015 00:01 IST

प्रभाग सभा : नगरसेवक आक्रमक

सिडको : सिडको भागातील उद्यानांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून दैनंदिन कामे तर सोडाच आपत्कालीन परिस्थितीतही अधिकारी लक्ष देत नसल्याचा प्रकार प्रभागसभेत नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी उघडकीस आणला. यावेळी उपस्थित सर्वच नगरसेवकांनी उद्यान विभागाचे सिडको प्रमुख राजेंद्र पांडे यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. पावसामुळे रस्त्यात पडलेले वृक्ष तातडीने न हटविल्यामुळे एका व्यक्तीचा अपघात झाल्याने त्यास उद्यान विभागच जबाबदार असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला. यावेळी त्यांनी मनपा आयुक्तांनाच सर्व घटनाक्रम सांगितल्यांनर यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी पडलेला वृक्ष तत्काळ हटविण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्यानंतर रस्त्यात पडलेला वृक्ष उचलण्यात आला.उद्यान विभागाचे पांडे हे कधीच नगरसेवकांनी सांगितलेली कामे करीत नसल्याचा आरोप यावेळी उपस्थित सर्वच नगरसेवकांनी केला. नगरसेवकांनी केलेल्या आरोपानंतर पांडे यांनी सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. त्यावर नगरसेवक उत्तम दोंदे म्हणाले, पांडे हे गेल्या अनेक महिन्यांपासून कोणतीच कामे करीत नसल्याने त्यांना उगीच का कामावर ठेवायचे? त्यांचंी सुट्टी करणे गरजेचे असल्याचेही दोंदे यांनी सांगितले. नगरसेवक शीतल भामरे, वंदना बिरारी, शोभा फडोळ, अश्विनी बोरस्ते, कल्पना चुंभळे, अ‍ॅड. अरविंद शेळके, शोभा निकम, हर्षा बडगुजर यांसह सिडको प्रभागातील सर्वच नगरसेवकांनी पांडे यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)