शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोची जागा गमावणार

By admin | Updated: November 27, 2015 22:50 IST

मखमलाबादला आरक्षण : भूसंपादनासाठी रक्कम देण्यास स्थायीचा नकार

नाशिक : महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती आणि प्रभागात विकासकामांचा खोळंबा पाहता मखमलाबाद परिसरातील कचरा डेपोसाठी आरक्षित असलेल्या ४१.८१ हेक्टर जागेच्या संपादनासाठी सुमारे ३९ कोटी रुपये देण्यास स्थायी समितीने नकार दर्शविला. आता संबंधित जागा मालकाने आरक्षण व्यपगत होण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्यास महापालिकेवर कचरा डेपोची जागा गमावण्याची वेळ येणार आहे.मखमलाबाद येथील कचरा डेपोकरिता आरक्षित असलेले ४१.८१ हेक्टर क्षेत्र चालू बाजारमूल्यानुसार संपादित करण्यासाठी ५० टक्के रक्कम ३८ कोटी ८५ लाख रुपये तातडीने जमा करण्याची सूचना भूसंपादन कार्यालयाने महापालिकेला केली आहे. मखमलाबाद येथील स.नं. ३२५/१ ते ३, ३२६, ३२७, ३२९ आणि ३३० पै. मधील कचरा डेपोकरिता आरक्षित असलेले ४१.८१ हेक्टर क्षेत्र संपादनाचा प्रस्ताव उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्या कार्यालयात प्रलंबित आहे. या प्रस्तावातील स.नं. ३२५/३ पै. च्या जमीनमालकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निकाल १३ आॅक्टोबर २०१५ रोजी लागून न्यायालयाने २.२७ हेक्टर क्षेत्र आरक्षणातून वगळण्याचा निर्णय दिलेला आहे. सदर निकालाचा आधार घेऊन अन्य जागामालकांनीही आरक्षण वगळण्याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावू नये यासाठी भूसंपादनाची अधिसूचना महापालिकेला तातडीने काढावी लागणार आहे. त्यासाठीच प्रशासनामार्फत भूसंपादनाकरिता सुमारे ३९ कोटी रुपये अदा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. परंतु, केवळ ३९ कोटी रुपये महापालिकेला द्यावे लागणार म्हणून सदस्यांनी त्यास विरोध दर्शविला. रंजना भानसी यांनी कोणत्या लेखाशीर्षाखाली सदरची रक्कम दिली जाणार असल्याचा प्रश्न उपस्थित केला. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत प्रशासनाकडून प्रभागातील विकासकामे केली जात नाही. अशावेळी भूसंपादनाकरिता एवढी मोठी रक्कम कुठून आली, असा सवालही त्यांनी केला. प्रा. कुणाल वाघ यांनीही सदर रक्कम कुठून देणार याचा खुलासा करण्याची सूचना केली. मात्र, जास्त चर्चा न करता सभापती शिवाजी चुंभळे यांनी सदरचा प्रस्ताव नामंजूर करत असल्याचे जाहीर केले. स्थायीच्या या निर्णयामुळे संबंधित जागामालकांकडून आता न्यायालयात दाद मागण्याची शक्यता असून त्यामुळे कचरा डेपोची जागा महापालिकेच्या हातातून जाण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)