शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:22 IST

कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.

संजय शहाणे ।इंदिरानगर : कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय करण्याबाबत कोणाचे दुमत नाही, मात्र वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला तर कसे होणार हा खरा प्रश्न आहे.  महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक पोलीस किंवा महापालिकेच्या वतीने शहर आणि उपनगरांच्या मुख्य रस्त्यांप्रमाणेच अन्य वसाहती, शाळा तेथील व्यवसाय या सर्वांचा विचार करून एकूणच वाहतुकीचे नियोजन करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.  इंदिरानगरमध्ये दिवसागणिक लोकवस्ती वाढत आहे. त्याचबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरात ये-जा करण्यासाठी पेठेनगर रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर यादरम्यान चारचाकी वाहनांची तीन ते चार गॅरेज आहेत.संबंधित गॅरेजमध्ये ट्रक, कार आणि अन्य चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दुरु स्तीसाठी येत असल्याने जागेअभावी पेठेनगर रस्त्यावरच सर्रासपणे तासन्तास वाहनांची दुरुस्ती सुरू असते. रस्त्यावरच ट्रक किंवा मोटारी उभ्या करून दुरुस्ती केली जात असल्याने रस्ता अरुंद होतो, कित्येकदा समोरून येणारे वाहनही दिसत नाही. त्यामुळे अपघातही घडत असतात. मोटार गॅरजेमुळे त्यामुळे वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे बनले आहे. दररोज लहान-मोठे अपघात घडून हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. तातडीने रस्त्यावरील वाहन दुरु स्ती थांबवून वाहतुकीस रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या वतीने वाहतूक नियोजनाच्या बाबतीत शहराचा मध्यभाग किंवा उपनगरांच्या मध्यवर्ती भागावरच भर दिला जातो. इंदिरा नगर, पेठेनगर, सार्थकनगर, वडाळा-पाथर्डी रोड अशा ठिकाणी काय सुरू आहे, तेथील वाहतुकीचे तीन तेरा वाजत असेल तर काय केले पाहिजे याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही. परिणामी नवविकसित भागात वाहतुकीची समस्या उग्र रूप धारण करीत असून, त्यावर उपाय करण्याची गरज आहे.