शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीने राबविले पाणीबचतीचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:37 IST

पाणी शुद्ध केल्यानंतर खराब समजले जाणारे पाणी बहुतेकदा फेकून देण्यात येते; परंतु पिंंपळगाव ग्रामपंचायतीने एक विशेष उपक्रम राबवून हे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला असून, त्यात त्यांना यश आले आहे. यात पाण्याची बचत होण्यास मोठी मदत होणार आहे. रोज सुमारे अडीच लाख लिटर पाणी सोडून दिले जात होते. आता या नवीन संकल्पनेमुळे अवघे तीस हजार लिटर पाणी सोडले जात आहे.

पिंपळगाव बसवंत : पाणी शुद्ध केल्यानंतर खराब समजले जाणारे पाणी बहुतेकदा फेकून देण्यात येते; परंतु पिंंपळगाव ग्रामपंचायतीने एक विशेष उपक्रम राबवून हे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला असून, त्यात त्यांना यश आले आहे. यात पाण्याची बचत होण्यास मोठी मदत  होणार आहे. रोज सुमारे अडीच लाख लिटर पाणी सोडून दिले जात होते. आता या नवीन संकल्पनेमुळे अवघे तीस हजार लिटर पाणी सोडले जात आहे. हे तीस हजार लिटर पाणी संपूर्ण गाळमिश्रित असल्याने ते सोडले जात आहे. जलशुद्धिकरण केंद्रात पाणी शुद्ध केल्यानंतर त्या टाकीला तळाशी साचलेला गाळ, अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करावा लागत होता. यानंतर ते पाणी उताराच्या दिशेने सोडून दिले जात होते. या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होत नव्हता. या पाण्याचे पुन्हा शुद्धिकरण होत नव्हते. पाच कोटी लिटर पाणी असे वाया जात होते. ही बाब लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्य भास्कर बनकर यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या ही बाब लक्षात आणून दिली. रोज वाया जाणारे पाणी कसे वाचवायचे याबद्दल ग्रामपंचायतीने उपक्रम राबवायचे ठरविले. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी बघून पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष भास्कर बनकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदावरे यांच्याशी चर्चा केली. ग्रामपंचायतीचे सकारात्मक धोरण शुद्धिकरणाच्या टाक्या धुतल्यानंतर सोडून दिल्या जाणाºया पाण्याचा पुनर्वापर करता येणे शक्य असल्याची बाब ग्रामपंचायत सदस्य भास्कर बनकर व ग्रामसेवक लिंगराज जंगम यांच्या लक्षात आली असता हा पाणी वाचवा प्रकल्प उभा कसा करायचा, हा प्रश्न डोळ्यासमोर होता. कारण सरकारच्या सध्याच्या योजनांमध्ये तरतूद नसल्याचेही स्पष्ट होत होते. ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट येत असल्याने भास्कर बनकर यांनी ग्रामपंचायतीसमोर हा प्रस्ताव ठेवला.ग्रामपंचायतीनेही सकारात्मक विचार करून पाणीपुरवठा विभागाकडून त्याची तांत्रिक मान्यता घेतली व १९ लाख रु पये खर्च करून केंद्राबाहेर टाकल्या जाणाºया पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा उभारली.यासाठी त्यांनी दोन लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी उभारली. व तेथूनच शुद्धिकरण केंद्राच्या स्वच्छतेनंतर ते अशुद्ध पाणी या टाकीत सोडले जाते. तेथे या पाण्यातील मातीचे कण तळाशी गेल्यावर ते पाणी पुन्हा शुद्धिकरण केंद्रात सोडले जाते व ते पुन्हा शुद्ध करून पिंपळगावच्या जलकुंभात सोडले जाते.