येवला : बाजार समितीच्या आवारात कांदा व भुसार मालाचे व्यापारी, शेतकरी, सभापतींसह संचालक मंडळाची सोमवारी सकाळी १० वाजता संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा जिल्ह्यातील बाजार समितीच्या अभ्यासात शेतकरी व संबंधित घटक यांच्याशी चर्चा करून ५ आॅगस्टपर्यंत शासनाला अहवाल सादर करणार आहे.या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने दरम्यान शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अडत कपात न करता प्रायोगिक तत्त्वावर नवीन कांदा बारदान ४५ किलो वजन गोणी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सकाळी ११ वाजता गोणी पद्धतीचे कांदा लिलाव सुरू झाले. कांदा बाजार आवारात १९० गोणीतून विक्रीस आलेल्या कांद्याचा लिलाव करण्यात आला. या कांद्याला किमान २०० रुपये प्रतिक्विंटल तर कमाल ८२७ रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी ७२७ रु पये भाव मिळाला.दरम्यान, शेतकऱ्याच्या अडतीचे घोंगडे कांदा खरेदीदारावर टाकून शेतकऱ्याच्या माथ्यावर असणारी अडत बंद केली. हे चांगले पाऊल असले तरी मोकळ्या (खुल्या) पद्धतीनेच कांदा लिलाव व्हावा, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. (वार्ताहर)
गोणी कांदा उत्पादकामध्ये नाराजी : व्यापाऱ्यांच्या भूमिकेविरोधात कळवणला शेतकरी रस्त्यावर
By admin | Updated: July 25, 2016 23:17 IST