शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर रवी पुजारी नाशिक कोर्टात हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:14 IST

वडाळा-पाथर्डी रोडवर एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू असताना गँगस्टर रवी पुजारी याने सुमारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली ...

वडाळा-पाथर्डी रोडवर एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीचे काम सुरू असताना गँगस्टर रवी पुजारी याने सुमारे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास गेम करू, अशी धमकी दिली होती. त्याचाच भाग म्हणून २५ नोव्हेंबर २०११ रोजी बिल्डरच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात बांधकाम व्यावसायिकांचा कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन नंतर राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे याचा तपास देण्यात येऊन पोलिसांनी चौघा जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारी, योगेश कल्ली ऊर्फ सुरेश बंगेरी व भुपेंद्र राजपत सिंह हे तिघे फरार होेते. मात्र, ज्या चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या विरुद्ध मोक्काअन्वये नाशिक न्यायालयात खटला चालला असता सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी युक्तिवाद केला असता चौघांपैकी तिघांना २०१९ मध्ये जन्मठेप तर एकाला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

गँगस्टर रवी पुजारीला काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांनी अटक केली असून, नाशिकच्या गुन्ह्यात रवी पुजारीला हजर करण्याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि.२३) विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश जी. पी. देशमुख यांच्यासमोर युक्तिवाद होऊन सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी बाजू मांडली व बांधकाम व्यावसायिकाला पुजारी याने दिलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग न्यायालयासमोर सादर करून त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी तसेच उर्वरित दोन्ही फरार आरोपींच्या शोधासाठी पाेलीस कोठडीची मागणी करण्यात आली असता, न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

चौकट====

ऑर्थर रोडहून आणले न्यायालयात

गँगस्टर रवी पुजारी सध्या ऑर्थर रोड कारागृहात असून, शुक्रवारी पहाटे सात वाजेच्या सुमारास मुंबई पोलिसांनी त्याला कडेकोट बंदोबस्त व पुरेपूर गोपनीयता पाळत सहायक पोलीस आयुक्त सोपान निगोट व सुमारे पन्नास सशस्त्र पोलिसांनी नाशिक न्यायालयात सव्वा अकरा वाजता हजर केले. न्यायालयीन प्रक्रिया आटोपताच पुन्हा त्याला मुंबईला नेण्यात आले.