शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरमधून अडीच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: August 1, 2016 00:37 IST

गोदावरीला पुन्हा पूर : विक्रेत्यांची तारांबळ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा,दिवसभरात २३ मि.मी. पावसाची नोंद

नाशिक : गंगापूर धरणाचा जलसाठा रविवारी (दि.३१) सकाळी ६ वाजता ८०.७१ इतका होता. पावसाची संततधार पहाटेपासून दिवसभर कायम राहिली. पावसाचा अंदाज घेत जलसंपदा विभागाने सकाळी १० वाजता पहिल्या टप्प्यात एक हजार ८०, तर दुपारी दोन वाजता एक हजार ६६० क्यूसेक असे एकूण दोन हजार ७४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला होता.पहाटेपासून सुरू झालेला पाऊस सकाळी ११ वाजेपर्यंत दमदार होता; मात्र दुपारी ११ वाजेनंतर पावसाचा जोर ओसरला; मात्र संततधार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरूच होती. वीस दिवसांपूर्वी गोदामाईला नाशिककरांनी दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच खळाळून वाहताना बघितले होते. धरणामधून त्यावेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नसतानाही वरुणराजाच्या जोरदार हजेरीने गोदामाई दुथडी भरून वाहत होती. सोळा तासांमध्ये शहरात जवळपास पावणे दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद त्यावेळी करण्यात आली होती. पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या नाशिककरांसाठी तो दिवस ‘सुपर सण्डे’ ठरला होता. त्यानंतर पुन्हा या रविवारी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककरांना पुन्हा ‘सुपर सण्डे’ची आठवण झाली खरी; मात्र पावसाचा जोर दुपारनंतर कमी होत गेल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरातील हवामान खात्याला २२.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करता आली. धरण क्षेत्रात बारा तासांमध्ये ४५ ते ५० मिलिमीटर पाऊस पडला, तर धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात ३६ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. दिवसभर गंगापूर धरण समूहाच्या परिसरात पावसाची संततधार कायम होती. सकाळी १० वाजेच्या सुमारास धरणामधून एक हजार ८० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला व त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुन्हा एक हजार ६६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. एकूण दोन हजार ७४० क्यूसेक इतके पाणी नदीपात्रातून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रवाहित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व जलसंपदा विभागाने दिली आहे. (प्रतिनिधी)