शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण शंभर टक्के : सर्व दरवाजे खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:17 IST

नाशिक : गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले ...

नाशिक : गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सर्व नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणातून ८१२९ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. पारंपरिक पूरमापक समजल्या जाणाऱ्या नदीपात्रातील दुतोंड्या मारुतीच्या खांद्यापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे, तर नदीवरील रामसेतू पुलाला पाणी लागले आहे. काठलगतचे नारोशंकराचे मंदिरही अर्धेअधिक पाण्यात बुडाले असून नदी रौद्ररूप धारण करीत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक विसर्ग असून, नाशिककरांच्या पाण्याची देखील चिंता मिटली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसल्याने बुधवारी सकाळी साडेपाच टीएमसी क्षमतेचे गंगापूर धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, धरणातून गोदावरीत पाणी झेपावले आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजता धरणातून १००० क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. सकाळी ११ वाजता २००० हजार क्युसेकने पाण्याचा वेग वाढविण्यात आला, तर तासाभरानंतर एकूण विसर्ग ४००० क्युसेक इतका करण्यात आल्याने नदीची पातळी झपाट्याने वाढल्याने पूर वाढला. अवघ्या तासाभरानंतर पुन्हा विसर्गाचा टप्पा वाढविण्यात येऊन ६००० क्युसेक तर दुपारी तीन वाजेनंतर ८१२९ क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राची पातळी वाढल्याने काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

काठावर असलेले नारोशंकर मंदिर अर्धेअधिक बुडाले, तर गांधी तलावालगत असलेल्या दशक्रिया छत्रीच्या छताला पाणी लागले. देवमामलेदार मंदिराचेही दाेन मजले पाण्याखाली बुडाले, तर गंगा-गोदावरी मंदिरही पाण्याखाली आहे.

--इन्फो--

हंगामात दुसऱ्यांना विसर्ग

या हंगामात गंगापूर धरणातून दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गेल्या ११ व १२ सप्टेंबरला झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे ६ हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. बुधवारी (दि.२२) राेजी ८ हजारांपेक्षा अधिक विसर्ग करण्याची वेळ आली. गंगापूर धरण क्षेत्रातील काश्यपी ९२, गंगापूर ११५, अंबोली ७९, गौतमी ८५ तर त्र्यंबकमध्ये ४३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाल्याने गंगापूर धरणात पाण्याची मोठी आवक झाली.

धरणातील विसर्ग (क्युसेक)

सकाळी ८.३० वा. - १०००

११ वा. - २०००

दुपारी १२ वा. - ४०००

१ वा. - ६०००

३ वा. - ८०००

सायंकाळी ६ - ८१२९