शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

गंगापूर धरण परिसर ‘प्रतिबंधित क्षेत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:21 IST

गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे.

नाशिक : गंगापूर धरण परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सावरगाव बॅकवॉटरला होणारी पर्यटकांसह मद्यपींच्या टोळक्यांची गर्दी, घडणाऱ्या दुर्घटना आणि हुल्लडबाजी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त वाढविली आहे. तसेच ठिकठिकाणी पोलीस व पाटबंधारे विभागाच्या वतीने सूचना फलक लावण्यात आले असून, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून धरण परिसर घोषित करण्यात आला आहे. गंगापूरचा जलसाठा ९१ टक्क्यांवर पोहचला असून छायाचित्र, सेल्फी टिपण्यासाठी गंगापूर धरणाच्या परिसरात तरुणाईने येऊ नये, असे आदेश पाटबंधारे खाते व पोलीस प्रशासनाने दिले आहेत.गंगापूर धरणाचा बॅकवॉटरचा सावरगाव शिवारातील परिसरासह मुख्य प्रवेशद्वार आणि गिरणारे भागातील बॅकवॉटर अशा संपूर्ण धरण परिसरात तरुण-तरुणींचा नेहमीच राबता असतो. धरणाची सुरक्षितता लक्षात घेता या संपूर्ण भागात जलसंपदा विभाग आणि पोलिसांव्यतिरिक्त अन्य कु णालाही प्रवेश देण्यात येणार नाही. हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या भागात युवकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या परिसरात फिरताना आढळणाºया युवकांच्या समूहावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गंगापूर धरण पाटबंधारे विभागासह पोलीस प्रशासन धरणाच्या सुरक्षिततेसाठी सतर्क झाले आहे. धरण परिसरात वारंवार युवक बुडण्याच्या घडणाºया दुर्घटनांनाही आळा घालण्यासाठी संयुक्तरीत्या कारवाईची मोहीम सुरू केली आहे. पर्यटकांबरोबरच धरणाची सुरक्षा महत्त्वाची असल्यामुळे कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. फिरते गस्त पथक कार्यान्वित असल्यामुळे धरण परिसरात आढळून येणाºया पर्यटक, मद्यपींवर कडक कारवाई केली जात असल्याची माहिती शाखा अभियंता सुभाष मिसाळ यांनी दिली.धिंगाण्याला बसणार चापगंगापूर धरणाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील आहे. संपूर्ण शहराला पाणीपुरवठा या धरणातून होतो. त्यामुळे धरणाची सुरक्षा व पर्यायाने नागरिकांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. पर्यटनाच्या नावाखाली धरण क्षेत्रात हुल्लडबाजी, मद्यप्राशनाला अलीकडच्या काळात वाव मिळाला होता; मात्र पोलिसांनी व पाटबंधारे विभागाने हा उपद्रव थांबविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे बेभान पर्यटकांच्या धिंगाण्याला आता चाप बसणार आहे.

टॅग्स :dam tourismधरण पर्यटनgangapur damगंगापूर धरण