शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर

By admin | Updated: August 12, 2016 23:00 IST

पाटबंधारे विभागाचे पत्र : कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी

नाशिक : गेल्या वर्षी जायकवाडीला पाणी सोडल्याने निर्माण झालेला तंटा, मराठवाड्यातील नेत्यांकडून होणारी चिथावणीखोर भाषा याचबरोबर धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांबरोबर सातत्याने कर्मचाऱ्यांशी होणारे वादविवाद या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. महापौरांसह निवासी उपजिल्हाधिकारी पाठोपाठ पाटबंधारे विभागानेही धरणाच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली असून ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे गंगापूर आणि कश्यपी धरणावर कायमस्वरूपी आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण सुमारे ८७ टक्के भरले आहे. शहरापासून १६ कि.मी.अंतरावर असलेल्या या धरणातून नाशिक शहराला पिण्यासाठी तसेच एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासह सातपूर औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने मोठा तंटा उभा राहिला होता. त्यातच मराठवाड्यातील एका नेत्याने धरण बॉम्बने उडवून देण्याची चिथावणीखोर भाषा केली होती. आता धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने येत्या तीन-चार महिन्यांत पुन्हा एकदा पाण्यावरून तंटा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवरच महापौर अशोक मुर्तडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाकडे धरणावर पोलीस बंदोबस्त पुरविण्याची मागणी केली होती. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनीही पाटबंधारे विभागाला पत्र पाठवून त्याबाबत दखल घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाने ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून गंगापूर धरणावर चार आणि कश्यपी धरणावर चार याप्रमाणे आठ पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी पुरविण्याची मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी पत्रात म्हटले आहे, शहरापासून धरण जवळ असल्याने धरण पाहण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढते आहे. गंगापूर धरण शाखेत सध्या आठ मजूर / चौकीदार कार्यरत असून दिवसपाळीसाठी धरण माथ्यावर दोन कर्मचारी, एक विश्रामगृहावर, तर एक धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असतो. त्याचप्रमाणे रात्रपाळीसाठी ४ कर्मचाऱ्यांमार्फत धरणाची सुरक्षितता पाहिली जात आहे. गंगापूर धरणाची लांबी ३.८ कि.मी. असून एवढ्या लांबीच्या धरण माथ्याचे संरक्षण करणे अवघड असल्याने गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे. त्यासाठी दिवसपाळीसाठी दोन व रात्रपाळीपाळीसाठी दोन याप्रमाणे चार पोलिसांची गरज आहे. त्याचबरोबर कश्यपी धरणावरही प्रकल्पग्रस्तांकडून नेहमी आंदोलने होत असतात. बऱ्याचदा कश्यपी धरणावर प्रकल्पग्रस्त येऊन सेवाद्वार उघडून घेतात व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. त्यामुळे कश्यपी धरणासाठीही दिवसपाळीत दोन, तर रात्रपाळीसाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याने सदर पोलीस बंदोबस्त तातडीने पुरविण्याची मागणीही पाटबंधारे विभागाने केली आहे. (प्रतिनिधी)