शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण ९१ टक्के

By admin | Updated: August 31, 2014 00:48 IST

गंगापूर धरणाचे विधिवत पूजन

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ९१ टक्के भरल्याने शनिवारी (दि.३०) सकाळी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्यासह सर्व प्रमुख विरोधी गटनेते यांच्या उपस्थितीत गंगापूर धरणाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्याचवेळी बहुचर्चित दोन वेळा पाणीपुरवठ्याचाही प्रश्न निकाली निघून महापौरांनी रविवारपासून (दि.३१) शहरात पूर्वीप्रमाणेच दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांना दिली.शहरात पुरेसा पाऊस न झाल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा अत्यल्प राहिल्याने जून महिन्यानंतर शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र जुलैच्या शेवटी व आॅगस्टमध्ये जोरदार पाऊस झाल्याने गंगापूर धरणाचा पाणीसाठा ९१ टक्के भरला. त्यामुळे शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेतील राजकारण तापले होते. त्यातच मनसेतील अंतर्गत संघर्षामुळे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली होती. महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी मात्र पाणीसाठ्याचा आढावा घेऊन त्यानंतरच दोन वेळा पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यातच शनिवारी सकाळी गंगापूर धरण भरल्याचे निमित्त साधून महापौरांच्या हस्ते विधिवत गंगापूर धरणाचे पूजन करण्यात आले. उपमहापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. राहुल ढिकले. विरोधी गटनेता सुधाकर बडगुजर, मनसेचे गटनेता अशोक सातभाई, संभाजी मोरूस्कर, शिवाजी गांगुर्डे, उद्धव निमसे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, देवयानी फरांदे, सुवर्णा मटाले, यशवंत निकुळे, सलीम शेख, सतीश सोनवणे, गुरुमित बग्गा, दामोदर मानकर, शशिकांत जाधव, अशोक मुर्तडक, रत्नमाला राणे, शोभा आवारे, सुरेखा नागरे, कविता कर्डक, रमेश धोंगडे, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)