शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचे गंगापूजन

By admin | Updated: May 28, 2015 00:09 IST

स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचे गंगापूजन

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने हजारो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत गोदाकाठी गंगापूजन करण्यात आले. अण्णासाहेब मोरे यांनी सपत्नीक गंगा गोदावरी मातेचे पूजन केले.स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गेल्या ५0 वर्षांपासून अखंडितपणे गंगापूजनाचा सोहळा होतो. गंगा गोदावरी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रघोष केला. रामकुंडावरील प्रमुख कार्यक्रमाअगोदर गंगापूररोड येथील उदयनगर श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलश व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमा असलेल्या सुशोभित रथांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर मुली व महिलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या. बँड पथक, लेझीम पथक, हाती ध्वज घेतलेले महिला-पुरुष, स्वामींचा व गंगा गोदावरी मातेचा जयघोष करीत मार्गक्रमण करीत होते. उदयनगर, एस.टी. कॉलनी, केटीएचएम कॉलेज, अशोकस्तंभ, मालेगाव स्टॅण्डमार्गे ही मिरवणूक रामकुंडावर आली.नाशिक महानगराच्या वतीने महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनीही गंगापूजनात सहभाग घेतला. यानिमित्ताने अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोदामाई स्वच्छता अभियानाचाही पुनरुच्चार केला.