शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गंगा गोदावरी पूजनाने पर्जन्यराजाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:15 IST

‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुमाउली की जय’च्या गजरात व गंगा गोदावरी मातेचा जयघोष करत मावळत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने स्वामी समर्थांच्या शेकडो सेवेकरी, क ष्टकऱ्यांनी गंगा गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजाला साकडे घातले. महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.

नाशिक : ‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुमाउली की जय’च्या गजरात व गंगा गोदावरी मातेचा जयघोष करत मावळत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने स्वामी समर्थांच्या शेकडो सेवेकरी, क ष्टकऱ्यांनी गंगा गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजाला साकडे घातले. महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.  निमित्त होते, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग व गंगा गोदावरी पुरोहित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.२२) रामकुंडावर गंगा दशहरा उत्सव साजरा करण्यात आला. पवित्र अधिकमासाचे औचित्य साधून अधिक ज्येष्ठ शुध्द अष्टमीच्या मुहूर्तावर पर्जन्यराजाला साकडे घालण्यासाठी सालाबादप्रमाणे या सोहळ्याचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. संध्याकाळी गोदाकाठावर रंगलेल्या या सोहळ्याप्रसंगी मंदाकिनी मोरे, आमदार सीमा हिरे, नगरसेवक वत्सला खैरे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, शिवाजी भोर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी शुक्ल यांनी दक्षिणवाहिनी गोदावरीचे धार्मिक माहात्म्य उपस्थितांना समजावून सांगितले. त्यानंतर पर्जन्य सुक्ताच्या पाठाला प्रारंभ करण्यात आला. सुमारे अर्धा तास उपस्थित शेकडो भाविकांनी पर्जन्य सुक्ताचे सामूहिक पठण केले. त्यानंतर अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते गंगागोदावरी पूजनाला प्रारंभझाला.पूूजनानंतर गणरायाची व गोदावरीची आरती करण्यात आली.अधिकमासातील शुध्द प्रतिपदा ते दशमीपर्यंत सर्वत्र गंगा दशहरा उत्सव साजरा करून गंगापूजन केले जाते. गंगा गोदावरीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत असून, दक्षिणवाहिनी गोदावरी आंध्र प्रदेशमध्ये सागराला जाऊन मिळते. शेकडो मैलांचा गोदाकाठ असून, जेथे जेथे शक्य होईल तेथे समर्थ सेवेकरी व भाविक दरवर्षी गंगापूजन करतात, अशी माहिती संयोजकांनी दिली.त्र्यंबकेश्वर येथे उगमस्थान व कुंभमेळ्याच्या शाहीस्नानाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या रामकुंड येथून गंगापूजनाला प्रारंभ करण्यात आला. गोदावरीच्या आरतीनंतर गुरुमाउली यांनी सपत्नीक गोदावरीची ओटी भरली. या गंगा दशहरा सोहळ्यास जिल्हाभरातून सेवेकºयांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. संपूर्ण सजीवसृष्टी सुखी व्हावी आणि पर्जन्यराजाची कृपादृष्टी लाभावी. सर्वत्र समाधानकारक व सुखावह वर्षा होऊन बळीराजा सुखावेल या उद्देशाने परंपरेनुसार गंगा दशहरा उत्सव गोदाकाठावर पार पडला. सजीवसृष्टीची जीवनदायिनी असलेल्या गोदावरी नदीचा सन्मान करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.  -अण्णासाहेब मोरे, गुरुमाउली

टॅग्स :godavariगोदावरी