शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गंगा आली रे अंगणी. .

By admin | Updated: August 4, 2016 00:30 IST

त्र्यंबकेश्वर जलमय : पाणीच पाणी चहुकडे

त्र्यंबकेश्वर : येथे पुराचे पाणी गावात कायम असून, ब्रह्मगिरीतील धबधबे वेगात वाहत होते. आज कुशावर्त तीर्थ संपूर्णपणे वरपर्यंत भरले होते. अनेकांनी ते उपसण्याचा प्रयत्न केला. विधीसाठी आलेल्या एका भाविकाला दारातूनच पिंडदान दारासमोरील नदीत वाहण्यास सांगितल्याने त्या भाविकाने पिंडदान करण्याठी गंगा आली रे अंगणी..! केवढे त्याचे भाग्य ! गावात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने पाहणी करण्याकरिता दीपक लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, यशवंत भोये, अभिजित काण्णव आदि फिरत होते. त्यांनी नुकसानीचा अंदाज घेतला.परिणामी गावातील विद्युतपुरवठा रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. तेली गल्लीत भूमिगत विद्युतवाहिन्या असल्याने खोलपर्यंत पाणी गेलेले असल्याने संपूर्ण गावाचा विद्युतपुरवठा बंद केल्याचे सांगण्यात आले. त्र्यंबकला गेल्या तीन दिवसांपासून संततधार असून, आज दिवसभर मुसळधारेने शहराला झोडपून काढले. ‘गावात पाणीच पाणी चहुकडे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या रविवारपासून येथे पावसांची संततधार सुरू आहे. अवघ्या तीन दिवसात ४२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैअखेर केवळ ३२ दिवसांत ११२५ मिमीपावेतो पावसाची नोंद झाली आहे. रविवारी ६३ मिमी, सोमवारी १२८ मिमी, तर मंगळवारी २३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी अधून मधून प्रचंड वेगाने सरी बरसत होत्या. नदीपात्रात काही ठिकाणी कचरा अडकल्याने गावात पाणी पातळीत वाढ होऊन मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पाणी कमी होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने गावात पाणी साचलेलेच आहे. कुशावर्त चौक, तेली गल्ली, भगवती चौक, लहान बजारपट्टी, मेनरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, न. पा. कार्यालयासमोरील संपूर्ण रस्ता, गोदावरी पुलावरील रस्ता, कदम पेट्रोलपंपासमोरील रस्ता आदि ठिकाणे जवळपास २ ते ३ फूट पाण्याखाली गेली होती. या ठिकाणी बस व मोटारसायकल पाण्यात अडकून तेथेच बंद पडल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. (वार्ताहर)