लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : औरंगाबादरोडवरील मंगलदीप स्विट दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला आडगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे. पोलीसांनी संशयितांकडून दोन दुचाकी मोटारसायकल, तलवार, कोयते यासारखे धारदार शस्त्रास्त्रे व रोख रक्कम असा जवळपास ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांनी अटक केलेल्या सहा संशयितांपैकी तीन संशयित आरोपी हे दिंडोरी तालुक्तयातील कसबे वणी शिवारातील असल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे. याबाबत माहीती अशी की, काल गुरूवार (दि. १५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराला आडगाव पोलीस ठाण्याचे बिटमार्शल कर्मचारी निलगिरीबाग समोरील परिसरात गस्त घालत असतांना रस्त्यालगत असलेल्या दोन दुचाकीजवळ पाच ते सहा संशयित दिसुन आले त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने बीटमार्गल कर्मचाऱ्यांनी सदर माहीती तत्काळ आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांना कळविली त्यानंतर गुन्हा शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दिंडोरी तालुक्तयातील कसबे वणी येथिल किरण भास्कर शेळके, अविनाश मनोहर गावित, अनिकेत कैलास माळी, राहूल चिंतामण बोडके (राहणार ओढा), तर आगरटाकळी येथिल रोहन शिवहरी देशमुख, योगेश बाळू कडाळे, आदि संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यातील काही संशयितांकडे धारदार शस्त्रास्त्रे, ब्लेडपान तसेच दुचाकींची क्रमांक (एम. एच. १५सी आर ९५९०), व (एम. एच. १५ सी यू ४२३०) तपासणी केली असता शिटाखाली आणखी शस्त्रास्त्रे मिळाली. पोलीसांनी संशयितांची कसुन चौकशी केली असता त्यांनी औरंगाबादरोडवरील मंगलदिप स्विटस या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली त्यानुसार आडगाव पोलीसात दरोडयाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
औरंगाबाद रोडवर दरोडयाच्या तयारीतील टोळी जेरबंद
By admin | Updated: June 16, 2017 18:29 IST