शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

By admin | Updated: June 17, 2017 00:38 IST

पंचवटी : औरंगाबादरोडवरील मंगलदीप स्विट दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला आडगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : औरंगाबादरोडवरील मंगलदीप स्विट दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला आडगाव पोलीसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी संशयितांकडून दोन दुचाकी, तलवार, कोयते यांसारखे धारदार शस्त्रास्त्रे व रोख रक्कम असा जवळपास ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांपैकी तीन संशयित आरोपी हे दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी शिवारातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवार (दि. १५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमाराला आडगाव पोलीस ठाण्याचे बिटमार्शल कर्मचारी निलगिरीबागसमोरील परिसरात गस्त घालत असताना रस्त्यालगत असलेल्या दोन दुचाकींजवळ पाच ते सहा संशयित दिसून आले त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने बीटमार्शल कर्मचाऱ्यांनी सदर माहिती तत्काळ आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांना कळविली त्यानंतर गुन्हा शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथील किरण भास्कर शेळके, अविनाश मनोहर गावित, अनिकेत कैलास माळी, राहुल चिंतामण बोडके (रा. ओढा), तर आगरटाकळी येथील रोहण शिवहरी देशमुख, योगेश बाळू कडाळे आदि संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यातील काही संशयितांकडे धारदार शस्त्रास्त्रे, ब्लेडपान तसेच दुचाकींची क्रमांक (एम. एच. १५सी आर ९५९०) व (एमएच १५ सीयू ४२३०) तपासणी केली असता शिटाखाली आणखी शस्त्रास्त्रे मिळाली. पोलीसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी औरंगाबादरोडवरील मंगलदीप स्विट््स या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली त्यानुसार आडगाव पोलिसात दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.