नाशिक : दुचाकीखाली येऊन मृत्यूमुखी पडलेल्या कुत्र्याच्या नुकसानभरपाईसाठी जुन्या नाशकातील एका तरुणाचे चौघा संशयितांनी अपहरण करून त्याच्याकडील रोख रकमेसह सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास रामवाडी परिसरात घडली़ राजेंद्र रमेश सोनवणे (२८, रा़ चव्हाटा) हा तरुण शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास दुचाकीने शालिमार येथील नेहरू उद्यानासमोरून जात होता़ त्यावेळी कुत्रे आडवे गेल्याने ते दुचाकीवरून घसरून खाली पडले तसेच कुत्राही जबर जखमी झाला़ कुत्र्यावरील उपचारासाठी सोनवणे यांनी जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या दुचाकीवर बसले व कुत्र्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले, मात्र रस्त्यातच कुत्र्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, सोनवणे यांची दुचाकी घेऊन दोघे संशयित तिथे आले व त्यांनी कुत्रे मारले असे म्हणत मारहाण करीत सोनवणेंना बळजबरीने दुचाकीवर बसवून रामवाडीतील परिसरात घेऊन गेले़ तसेच कुत्र्याच्या भरपाईपोटी पन्नास हजारांची मागणी करीत मारहाण केली.सोनवणे यांच्याजवळील ४० हजारांची रोकड, १२ हजार रुपयांचे रिचार्ज व्हाऊचर व मोबाइल फोन असा ५५ हजार १०० रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. (प्रतिनिधी)
तरुणाचे अपहरण करून लुटीची घटना
By admin | Updated: March 20, 2016 23:41 IST