शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करणारी आठ जणांची टोळी

By admin | Updated: June 29, 2015 01:16 IST

चोरी करणारी आठ जणांची टोळी

इंदिरानगर : औद्योगिक वसाहतीतील बंद कंपन्यांना लक्ष्य करून चोरी करणारी आठ जणांची टोळी इंदिरानगर पोलिसांनी शनिवारी रात्री सिनेस्टाइल थरारक पाठलाग करून पकडली़ या टोळीतील सर्वजण इगतपुरी, घोटी येथील रहिवासी असून, त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह बोलेरो वाहन जप्त करण्यात आले आहे़ न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ इंदिरानगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आऱ डी. गवळी हे कर्मचाऱ्यांसह शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास वडाळागाव परिसरात गस्त घालीत होते़ त्याचवेळी उपनगरकडून येणारी राखाडी रंगाचे बोलेरो (एमएच १५, सीटी १४९७) पोलिसांना पाहून वडाळागाव, कलानगरमार्गे वडाळा, पाथर्डी रस्त्याने पाथर्डीगावाकडे निघून गेली़ पोलिसांनी तत्काळ ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली़ याचवेळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक व बीट मार्शल यांनी हे वाहन पाथर्डी फाटा चौफुलीवर आले असता त्यास चहूबाजूंनी घेरून पकडले़ या वाहनात संशयित शिवाजी पोपट घारे (वय २५, रा़ काकुस्ते, इगतपुरी), संजय देवराम घारे (वय २९, रा़ घोटी), फैजल रोशन शेख (वय १९, रा़ घोटी) स्वप्नील पोपट लहाने (वय २०, रा़ घोटी), अफसर रोशन शेख (वय २९, रा़ घोटी), इकबाल रोशन शेख (वय २८, रा़ घोटी), सतार रोशन शेख (वय ३८, रा़ घोटी), अफजल रोशन शेख (वय २६, रा़ घोटी) हे बसलेले होते़ या आठही संशयितांची तपासणी केली असता त्यांच्याकडे लोखंडी पाइप, लोखंडी पट्टा, लोखंडी पाते, धारदार गुप्ती, स्क्रू डायव्हर असे दरोड्याचे साहित्य मिळाले़ इंदिरानगर पोलिसांनी या संशयितांवर दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली असून, बोलेरो वाहनही जप्त केले आहे़ या सर्वांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (वार्ताहर)