नाशिक : सिडको येथील आर्यावर्त गृहप्रकल्पात विविध उपक्रमांसह पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. सिद्धेश लोखंडे आणि उपाध्यक्ष सुनील सोनावणे यांनी विशेष लक्ष दिले. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतीची स्थापना करण्यात आली होती. विविध खेळ, करमणुकीचे कार्यक्रम, मुलांच्या चित्रकला आणि इतर गुणांना वाव देता येतील अशा विविध स्पर्धा राणी जैन, पुष्कर अमृतकर आणि नितीन वराडे यांनी आयोजित केल्या .गणपती अथर्वशीर्ष सामुदायिक पठणाचा कार्यक्रम दीप्ती भालेराव, राजश्री कुलकर्णी यांच्या पुढाकाराने पार पडला. पर्यावरणाचे भान राखून कृत्रिम तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी नाना महाले, नगरसेवक राजेंद्र महाले, प्रकाश अमृतकर, सुजय पारख, मकरंद कुलकर्णी आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सिडकोतील आर्यावर्त गृहप्रकल्पात गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST