शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गणरायांच्या आगमनाची तयारी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 18:05 IST

नाशिक : गणरायाच्या आगमनाला आठवडा बाकी असताना शहरात गणशोत्सोवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जोरात तयारी सुरू केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीसमोरील रविवार कारंजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भव्य मंडप उभारणीस प्रारंभ केला आहे.शहराच्या रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, परिसरांतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे त्यांच्या आरासासाठी प्रख्यात आहेत. सुंदर ...

नाशिक : गणरायाच्या आगमनाला आठवडा बाकी असताना शहरात गणशोत्सोवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जोरात तयारी सुरू केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीसमोरील रविवार कारंजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भव्य मंडप उभारणीस प्रारंभ केला आहे.शहराच्या रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, परिसरांतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे त्यांच्या आरासासाठी प्रख्यात आहेत. सुंदर नारायण मित्रमंडळ दरवर्षी सामाजिक संदेश देण्याची आरास तयार करीत असतो, तर बी. डी. भालेकर मैदानावरील गणेशोत्सव आरासही नाशिककरांचे आकर्षण ठरत असतो. गाडगे महाराज पुतळ्याजवळील दरवर्षी आकर्षण ठरणाºया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आकर्षक रंगीबेरंगी लाइट सजावटीच्या आरासास प्रारंभ झाला आहे. शहराच्या सर्वच भागांत गणरायाच्या आगमनाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने शहराच्या प्रमुख भागात जवळपास साडेपाचशेहून अधिक ठिकाणी गणेशमूर्ती विक्री केंद्रासाठी गाळे भाडे तत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. शहरातील सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या उपनगरांमध्येही गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. यंदा प्रथमच महाराष्टÑ विद्युत वितरण कंपनीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याचे जाहीर करून वीजचोेरीस आळा घालण्यासाठी पाऊल उचलले आहे. येत्या २५ आॅगस्टला गणरायांचे आगमन होत असून, यंदा तब्बल १२ दिवस गणरायांचा मुक्काम राहणार आहे. ५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.