इंदिरानगर : परिसरात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी तयारीस वेग आला आहे. परिसरातील सर्व मंडळांची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठका घेऊन कार्यकारिणी निवड सुरुवात झाली आहे. मनपाच्या निवडणुकीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.परिसरातील बहुतेक मंडळांनी बैठका घेऊन कार्यकारिणीची निवड करण्यात येत आहे. तसेच आकर्षक देखावे तयार करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. इंदौर, पुणे, मुंबई येथून आकर्षक विद्युत रोषणाई आणण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. भाजपाप्रणीत युनिक ग्रुप, इंदिरानगर युवक मित्रमंडळ, अरुणोदय मित्रमंडळ, अजय मित्रमंडळ, विनयनगर युवक मित्रमंडळ, सह्याद्री युवक मित्रमंडळ, स्वा. वि. दा. सावरकर मित्रमंडळ, अष्टविनायक मित्रमंडळ, अजिंक्य मित्रमंडळसह राजीवनगर, चेतनानगर भागातील मंडळांनी तयारीस सुरुवात केली आहे.
गणेशोत्सव मंडळांच्या तयारीला प्रारंभ
By admin | Updated: August 14, 2016 23:15 IST