शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भक्तिमय वातावरणात गणेश जयंती साजरी

By admin | Updated: January 23, 2015 23:53 IST

पंचवटी परिसर : विविध धार्मिक कार्यक्रम

पंचवटी : येथील पंचवटी परिसरातील ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. गणेश जयंतीनिमित्ताने होम, हवन, आरती, महापूजा तसेच पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलेले होते. मालवीय चौकातील श्री धूम्रवर्ण गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्ताने सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धूम्रवर्ण गणेश मंदिरापासून निघालेली पालखी मिरवणूक पंचवटी कारंजा, मालवीय चौक, सरदारचौक, साईबाबा मंदिरमार्गे, कपालेश्वर पटांगण आदि भागांतून काढण्यात येऊन कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. दुपारी महाआरती करण्यात आली त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप झाले. त्यानंतर पंचम गुरू पिठाधीश स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या हस्ते आरती व श्री गणेशाला एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. हिरावाडीतील शक्तीनगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. माघी गणेश जयंतीनिमित्ताने सप्ताहाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री गणेशाचे विधीवत पूजन करण्यात आले त्यानंतर महाआरती करण्यात येऊन गणेश जन्म साजरा करण्यात आला. गणेश जन्म होताच उपस्थित भाविकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. दुपारी भजन व कीर्तनाचे कार्यक्रम झाले. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण समाप्ती करण्यात आली. माघी गणेश जयंती उत्सवानिमित्ताने गेल्या आठवड्याभरापासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचा अखंड काल्याच्या कीर्तनाने समारोप करण्यात आला.