शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात गणेशमूर्तींनी बाजारपेठ सजली

By admin | Updated: August 31, 2016 22:35 IST

येवल्यात गणेशमूर्तींनी बाजारपेठ सजली

येवला : शहरासह तालुक्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. लहान-मोठी गणेशमूर्तींची दुकाने सजली आहेत. मूर्तिकार श्रींच्या मूर्तीवरून अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत तर उल्लेखनीय म्हणजे यंदा इको फ्रेंडली (पर्यावरणाशी सुसंगत) गणेशमूर्तीची मागणी वाढली आहे.गणेशमूर्ती विक्र ीसाठी नेण्यापूर्वी कारागीर रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात व्यस्त असून, शहरातील गणेश मंडळाचे मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणेशमूर्ती तयार करण्याची व तयार मूर्तीची बुकिंग करून स्थापनेच्या दिवशी मूर्ती आणण्याचे नियोजन केले जात आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून रात्रीचा दिवस करीत गणेशमूर्ती तयार करण्यात व्यस्त असलेले कारागीर अखेरचा हात मारून रंगरंगोटीचे काम पूर्ण करीत आहेत. शहरातील नगर -मनमाड रोडवरील कलासागरमधील कलाकार अजय परदेशी यांचे अवघे कुटुंब गणेशमूर्ती, तसेच महालक्ष्मीच्या आकर्षक मुखवटे तयार करतात. येथील परदेशी कुटुंबीय मूर्ती तयार करतात. त्यांच्याकडे शहरातील बऱ्याच गणेश मंडळांनी मूर्तीसाठी आॅर्डर दिली आहे. तसेच घरगुती पूजनासाठी ते छोट्या गणेशमूर्ती विक्र ीसाठी उपलब्ध करतात. यावर्षी मल्हार, लालबागाचा राजा, मयूरेश्वर आदींसह अष्टविनायकाच्या रूपातील गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. यात एक फुटापासून पाच फुट उंचीपर्यंतच्या मूर्तींचा समावेश आहे. येवला शहर व ग्रामीण भागात सुमारे 150 पेक्षा अधिक मित्र मंडळे असून सर्व तयारीला लागले आहेत.