शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्ती बाजारात दाखल

By admin | Updated: August 31, 2016 22:05 IST

ओझर : पेण,अहमदनगर,खेडगाव,कुंभारी येथील मूर्तींना मागणी

ओझर : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाने परिसरातल उत्साहाचे वातावरण असून, आकर्षक गणेशमूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.येथील बाजारपेठेत मूर्तीची मोठी उलाढाल होत असते. ओझर येथे पेन, अहमदनगर, संगमनेर, खेडगाव, कुंभारी या ठिकाणांहून मूर्ती विक्रीसाठी येतात. यात मुख्यत: प्लॅस्टर आफ पॅरिस आणि शाडूच्या मूर्ती असतात. त्यातदेखील तरुणाईमध्ये सेलिब्रिटी बाप्पाची विशेष मागणी असते. मागील वर्षी जसे जय मल्हार आणि बाहुबलीच्या पेहराव असलेल्या मूर्तींनी भूरळ घातली होती. त्याच प्रमाणे यंदा यावर्षीदेखील बाजीराव मस्तानी, नटसम्राट बाजारात दाखल झाले आहेत. लालबागचा राजा आणि दगडूशेठ गणपती सर्वात लोकप्रिय आहे. येथील बाजारात प्रकर्षाने दिसते; परंतु आता अनेक पर्यावरणप्रेमी कुटुंब इको फ्रेंडली गणपतीला प्राधान्य देत आहे व लोकांमध्ये जाऊन जनजागृती करत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाववाढ तब्बल वीस टक्क्यांनी वाढली आहे. मूर्ती बनवण्याच्या साहित्यात प्रचंड वाढल्यामुळे विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण याची सरळ झळ सामान्य भक्ताला बसणार आहे. ओझरमध्ये तयारीने वेग घेतला असून, परिसरात मूर्ती विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. (वार्ताहर)