शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देत केली गांधीगिरी

By admin | Updated: July 8, 2017 00:09 IST

नाशिक : पॉलिहाउस आणि शेडनेटसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केवळ दीड लाखांच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न करता पॉलिहाउस आणि शेडनेटसाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देऊन स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्णातील पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.दुपारी कालिदास कलामंदिर परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा शालिमार, शिवाजीरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काही काळ मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करीत नंतर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना पुष्पगुच्छ देत गांधीगिरी करीत पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे साकडे घातले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. सरकारने याचा पुनर्विचार करावा. तसेच पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना कोणत्याही अटी न लावता सरसकट कर्जमाफी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी २००८-०९ पासून हाताला काही काम नसल्याने पॉलिहाउस व शेडनेटची निर्मिती केली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले; मात्र फयानसारख्या वादळामुळे अनेक पॉलिहाउस व शेडनेट उद्ध्वस्त झाले. त्यामुळे हजारो शेतकरी कर्जबाजारी झाले. पॉलिहाउस व शेडनेटधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, शाश्वत शेतीसाठी शाश्वत पाणी व वीज उपलब्ध करून द्यावी, जिल्ह्णातून हवाई शेतमाल वाहतूक व वातानुकूलित रेल्वे वाहतूक सुरू करावी यांसह विविध मागण्यांचा समावेश होता.