शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या सभ्य संस्कृतीला गालबोट सहन करणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:12 IST

नाशिकची घोडदौड ही अत्यंत वेगाने होत आहे. येथील शहरी-ग्रामीण जनता मुळात प्रगल्भ आणि कायद्याचे पालन करणारी आहे. तसेच येथील ...

नाशिकची घोडदौड ही अत्यंत वेगाने होत आहे. येथील शहरी-ग्रामीण जनता मुळात प्रगल्भ आणि कायद्याचे पालन करणारी आहे. तसेच येथील गावपातळीवर राहणारे लोकसुद्धा पाहुण्यांना आदराची वागणूक देतात अन‌् त्यांचे मनापासून आदरातिथ्य करतात; मात्र पाहुण्यांनी नाशिकच्या गावकुसातील संस्कृतीशी एकरूप होत येथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेत पर्यटन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. कुठल्याहीप्रकारे नाशिकच्या नावलौकिकाला तडा जाईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद‌्भवेल असे कृत्य पाहुण्यांनी या पुण्यनगरीत करू नये, असेही पाटील यांनी ‘लोकमत’च्या संवाद उपक्रमात ठणकावून सांगितले. यावेळी ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहाय्यक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले.

कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या काळात नाशिकच्या ग्रामीण जनतेने पोलिसांना मोठे सहकार्य केले. कडक निर्बंध व लॉकडाऊनच्या काळात येथील ग्रामीण जनतेने गरजूंना मदतीचा हात पुढे करत आपल्यातील संवेदनशीलता अन‌् माणुसकीचा प्रत्ययही दिला, असेही पाटील यांनी संवादात अधोरेखित केले.

नाशिकच्या मालेगावामध्ये असलेला कुशल कारागीर वर्ग हा अन्य कुठल्याही शहरात अपवादानेच दिसून येईल. येथील कारागीर अशिक्षित जरी असले तरीदेखील त्यांच्यामधील कष्टाची तयारी अन‌् कुशलता वाखाण्याजोगी अशीच आहे; मात्र दुर्दैवाने मालेगावाला अद्यापही औद्योगिक झोन म्हणून बघितले जात नाही अन‌् औद्योगिकदृष्टया आवश्यक असलेला ‘बॅकअप’ पुरविला जात नसल्याची खंतही पाटील यांनी बोलून दाखविली.

--इन्फो--

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर नाशिकच्या पर्यटनाचा मैलाचा दगड!

नाशिकचे पर्यटन क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. येथील दुर्ग पर्यटन, धरण पर्यटन, निसर्गपर्यटनाला दिवसेंदिवस चालना मिळत आहे. इगतपुरी तालुक्यात लवकरच ‘आयुर्वेदिक वेलनेस हब’ तसेच भावली धरण भागातील विविध विकास प्रकल्प आकारास येणार आहे. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हे तालुके नाशिकच्या पर्यटनाच्या घोडदौडीमध्ये मैलाचा दगड ठरणार आहे, असाही विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

--इन्फो--

‘खाकी’चा पाहुणचार देणारच!

कायद्यापुढे सर्वच समान आहे. कायद्याचा भंग करताना आढळून आलेल्या सेलिब्रिटीवर्गाला ‘खाकी’चा मनसोक्त पाहुणचार दिला जाणार आहे. जेणेकरून यापुढे निसर्गाचे वरदान लाभलेल्या इगतपुरीसारख्या तालुक्यात आणि त्र्यंबकेश्वर भागातसुध्दा कोणीही पाहुणे अंमली पदार्थांची अशाप्रकारे नशा करण्याचे धाडस करणार नाही तसेच धनदांडगे मंडळीसुद्धा आपले बंगले, रिसॉर्ट भाडेतत्त्वावर देताना चारदा विचार करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच पाहुण्यांचा उपलब्ध करून देतील, असेही सचिन पाटील यावेळी म्हणाले. इगतपुरीच्या रेव्ह पार्टीवरील कारवाईतून अनेकांना धडा मिळाल्याचेही ते म्हणाले.

===Photopath===

300621\30nsk_21_30062021_13.jpg

===Caption===

सचिन पाटील, पोलीस अधीक्षक